Shani Gochar: सन २०२६ मधील शनी जयंती खास मानली जात आहे. कारण यंदा शनी जयंती शनीवारीच आली आहे. तसेच शनी अमावस्येदरम्यान शनीदेव नक्षत्र बदल करून रेवती नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. हा योग ५ राशींच्या लोकांना भरपूर धनलाभ आणि प्रगती देणारा ठरणार आहे.
शनीचा रेवती नक्षत्रात गोचर
शनी जयंती ज्येष्ठ अमावस्येला साजरी केली जाते. ही अमावस्या १६ मे २०२६ रोजी सकाळी ०५:११ वाजता सुरू होऊन १७ मेच्या रात्री दीड वाजेपर्यंत राहणार आहे. तसेच १७ मे २०२६ रोजीच शनीदेव रेवती नक्षत्रात गोचर करणार आहेत. त्यामुळे शनी अमावस्येच्या प्रभावातच शनीचे नक्षत्र परिवर्तन होणार असून, याचा ५ राशींना ऑक्टोबरपर्यंत करिअरमध्ये प्रगती आणि अनपेक्षित धनलाभ मिळू शकतो.
वृषभ राशी (Taurus Horoscope)
शनीच्या नक्षत्र परिवर्तनाचा हा योग वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. नवीन मार्गांनी उत्पन्न वाढेल, त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. अडकलेली कामे पूर्ण होतील. नोकरीत मेहनतीचे फळ प्रमोशनच्या रूपात मिळू शकते. आत्मविश्वास वाढेल.
मिथुन राशी (Gemini Horoscope)
शनीचा हा योग मिथुन राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये काही अनपेक्षित बदल घडवू शकतो. मात्र काही काळानंतर परिस्थिती सुधारेल. तुमचा मान-सन्मान पुन्हा वाढेल. आर्थिक प्रगती होईल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात.
तूळ राशी (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांना हा काळ करिअरमध्ये मोठी प्रगती देणारा ठरेल. उच्च पद मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल. पगारवाढ होण्याची शक्यता आहे. नवीन ओळखी आणि संपर्क वाढतील. व्यवसायात वेग राहील. भविष्यात चांगले दिवस येतील.
वृश्चिक राशी (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शनीचे नक्षत्र परिवर्तन आयुष्याला नवी दिशा देऊ शकते. विनाकारण होणारे खर्च कमी होतील. पैसे बचत आणि गुंतवणूक करण्यात यश मिळेल. उत्पन्नातही वाढ होईल. आयुष्यात आनंदाचे क्षण येतील.
कुंभ राशी (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरणार आहे. तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात सुधारणा दिसून येईल. बोनस किंवा अडकलेले पैसे मिळाल्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. सुख-सुविधांसाठी खर्च करू शकता. मात्र शॉर्टकट मार्गांचा वापर टाळा.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
