Shani Rashi Parivartan 2022: शनी २९ एप्रिलपासून शनि ग्रहाने मकर राशी सोडून कुंभ राशीत प्रवेश केला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो तेव्हा त्याचे शुभ आणि अशुभ प्रभाव सर्व राशींवर दिसून येतात. संक्रमणाचा काळ काही राशींसाठी फायदेशीर असला तरी काही राशींसाठी तो त्रासदायक असतो. त्याचप्रमाणे काही राशीच्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागेल. यासह दोन राशींवर शनिध्याची सुरुवात झाली असून एका राशीवर शनि साडेसाती सुरू झाली आहे. जाणून घ्या कोणत्या राशींवर शनीच्या राशी बदलाचा अशुभ प्रभाव पडेल-

मेष (Aries)

ज्योतिष शास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ त्रासदायक असू शकतो. शनीने राशी बदलताच मेष राशीचा त्रास वाढू शकतो. या काळात तुम्हाला कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतील. वादाची परिस्थिती निर्माण होईल. कर्जाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. या काळात संयम बाळगा.

(हे ही वाचा: Astrology: मे महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती कशा असतात? जाणून घ्या त्यांच्या स्वभावाविषयी)

सिंह (Leo)

सिंह राशीच्या लोकांना कामात अडथळे येऊ शकतात. शनिमुळे तुम्हाला कामात अपयशाला सामोरे जावे लागू शकते. या दरम्यान राग टाळा, अन्यथा तुमची प्रतिमा खराब होऊ शकते. शनी तुमच्यासाठी अनेक समस्या निर्माण करेल. या काळात आरोग्याची काळजी घ्या.

(हे ही वाचा: Numerology: ‘या’ जन्मतारखा असलेल्यांसाठी मे महिना असेल खूप शुभ, होईल धन-लाभ)

कन्या (Virgo)

या राशीच्या लोकांसाठी शनि अनेक समस्या निर्माण करू शकतो. कन्या राशीच्या लोकांना मुले आणि आरोग्याशी संबंधित समस्या असू शकतात. मुलाच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या. शिक्षणाशी संबंधित लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक अडचणी वाढू शकतात.

(हे ही वाचा: Astrology: ‘या’ ३ राशीचे लोक मानले जातात स्वार्थी!)

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)