Shani Nakshatra Gochar 2024: ज्योतिषशास्त्रानुसार शनि ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा प्रभाव मेष ते मीन राशींच्या व्यक्तींवर विविध प्रकारे पाहायला मिळतो. येत्या १८ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजून ३ मिनिटांनी शनि गुरू ग्रहाच्या पूर्वा भाद्रपद नक्षत्राच्या द्वितीय चरणात प्रवेश करणार आहे. शनिच्या या नक्षत्र परिवर्तनाने काही राशींच्या व्यक्तींना धन-संपत्ती आणि सुख मिळेल.

शनिचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश (Shani Nakshatra Gochar 2024)

मेष

मेष राशीच्या व्यक्तींना शनिचा पूर्वा भाद्रपद नक्षत्राच्या द्वितीय चरणातील प्रवेश खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात आर्थिक लाभ होतील. व्यावसायिकांना मेहनतीचे फळ मिळेल. करिअरमध्ये हवे तसे यश संपादित कराल. आर्थिक स्थैर्य लाभेल. आयुष्यात अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. कुटुंबात सुख-समृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. प्रेमसंबंधांमधील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल. मुलांकडून आनंदीवार्ता कानी पडतील. मानसिक तणाव दूर होईल.

तूळ

शनिचा पूर्वा भाद्रपद नक्षत्राच्या द्वितीय चरणातील प्रवेश खूप लाभदायी ठरेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. तुम्हाला पद-प्रतिष्ठा प्राप्त होईल. मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. कामाच्या ठिकाणी हवे तसे यश मिळवाल. वरिष्ठ तुमच्या कामामुळे तुमच्यावर खूश असतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. त्यांच्यासोबत दूरचे प्रवास घडतील. ज्ञानात भर पडेल. आयुष्यात प्रेमसंबंध सुखमय होतील. तीर्थक्षेत्रांना भेटी द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. विविध गोष्टी करण्याची संधी मिळेल.

हेही वाचा: १७ सप्टेंबरपर्यंत बक्कळ पैसा! शुक्राचे राशी परिवर्तन होताच ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार भाग्याची साथ

मकर

मकर राशीच्या व्यक्तींनादेखील शनिचा पूर्वा भाद्रपद नक्षत्राच्या द्वितीय चरणातील प्रवेश सकारात्मक परिणाम देणारा ठरेल. या काळात विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी मिळेल. कुटुंबीयांसह फिरायला जायचा प्लॅन कराल. अडकलेले पैसे परत मिळतील. गुंतवणूक करणं फायदेशीर ठरेल. या काळात तुमची अनेक दिवसांपासूनची अडकलेली कामे पूर्ण होतील. समाजात मानसन्मान वाढेल. फक्त कोणताही निर्णय विचार करून घ्या. उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. मानसिक, शारीरिक आरोग्य उत्तम राहील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)