Shani Margi 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह विशिष्ट वेळेत राशिबदल करतात. हे ग्रह कधी सरळ चालीने चालतात; तर कधी वक्री होतात. त्याचा मानवी जीवनावर परिणाम होत असतो. यात न्याय देवता शनिदेव जून महिन्यात स्वत:च्याच राशीत म्हणजेच कुंभ राशीत वक्री झाले होते. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात म्हणजे दिवाळीत शनिदेव सरळ चाल चालणार आहेत; ज्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. पण, अशा तीन राशी आहेत की, ज्यांना शनिदेवाचा विशेष आशीर्वाद मिळेल. या काळात या राशीधारकांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. त्याशिवाय अचानक आर्थिक लाभ आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊ कोणत्या भाग्यशाली राशी आहेत त्या…

मिथुन

शनीची थेट चाल मिथुन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळू शकते. त्याचबरोबर तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते आणि अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. तुम्हाला कामानिमित्त किंवा व्यावसायिक कारणांसाठी प्रवासाची संधी मिळेल. यावेळी कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील. या काळात तुम्ही वाहन आणि मालमत्तेची खरेदी करू शकता. तसेच तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेत यश मिळू शकते.

वृश्चिक

शनिदेवाची प्रत्यक्ष चाल वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते. यावेळी तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. याव्यतिरिक्त कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील. वाहन आणि मालमत्तेची खरेदी करू शकता. या काळात नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदारी मिळू शकते. त्याचबरोबर व्यावसायिकांना चांगला नफा होऊ शकतो. नोकरदार लोकांना यावेळी बढती मिळू शकते आणि बेरोजगारांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात.

मकर

शनिदेवाची प्रत्यक्ष चाल मकर राशीसाठी शुभ ठरू शकते. यावेळी सामाजिक आणि धार्मिक कार्य केल्याने समाजात तुमचा मान-सन्मान वाढू शकतो आणि पैशाशी संबंधित समस्याही दूर होतील. त्याचबरोबर व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळू शकतात. तसेच, तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमचे संवाद कौशल्य सुधारेल आणि त्यामुळे लोक प्रभावित होतील. उत्कृष्ट कल्पनांसह व्यवसाय हाताळण्यास सक्षम व्हाल.