Shani Gochar 2024: ज्योतिषशास्त्रात शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता म्हटले जाते. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शनी शुभ स्थितीत असतो अशा व्यक्तींना आयुष्यात अनेक सुख-सुविधा प्राप्त होतात. तसेच शनी अशुभ स्थितीत असल्यास व्यक्तीला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. तसेच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तींवर शनीची नेहमी शुभ दृष्टी असते. नवग्रहांमध्ये शनी सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे. त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करण्यासाठी जवळपास अडीच वर्षाचा कालावधी लागतो.

ज्योतिषशास्त्रानुसार, सध्या शनी त्याच्या मूळ त्रिकोण राशी असलेल्या कुंभ राशीत आहे. जिथे पंच महापुरूषातील एक असलेला शश राजयोग निर्माण झाला आहे. या राशीत शनी २०२५ पर्यंत राहील. ज्याचा प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल.

वृषभ

या राशीमध्ये शनी दहाव्या भावात विराजमान असून याचा या राशीच्या व्यक्तींना मार्च २०२५ पर्यंत विशेष लाभ होईल. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शश राजयोग खूप लाभकारी सिद्ध होईल. अडकलेली कामे पूर्ण होतील, करिअरमध्ये हवे तसे यश मिळविता येईल. मनातील इच्छा पूर्ण होतील. नव्या कामाची सुरुवात होईल. कामातील अडथळे दूर होतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. भौतिक सुख प्राप्त होईल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील.

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींसाठीही शनीची कुंभ राशीतील उपस्थिती शुभ फळ देणारी असेल. या राशीच्या सातव्या घरात शनी विराजमान आहे. या राशीच्या व्यक्तींसाठी मार्च २०२५ पर्यंतचा काळ खूप अनुकूल असेल. शश राजयोगाच्या प्रभावाने या राशींना वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होतील. कर्ज कमी होईल. नोकरी, व्यवसायात फायदा होईल. आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील. प्रत्येक कामात यश मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील.

हेही वाचा: तब्बल ३० वर्षांनंतर शनी-सूर्य करणार मालामाल; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे बदलणार आयुष्य

तूळ

तूळ राशीचा केंद्र आणि त्रिकोण भावाचा स्वामी असून पाचव्या घरात विराजमान आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल.या राशीच्या व्यक्तींना शश राजयोगाचा चांगला फायदा होईल. शनीच्या वक्री होण्याने मानसिक आणि शारीरिक तणाव कमी होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. स्पर्धा परिक्षेत यश मिळेल. जोडीदाराची प्रत्येक गोष्टीत साथ मिळेल. जुने वाद मिटतील. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)