Shani Dev Nakshatra Parivartan: ज्योतिषशास्त्रात शनिदेवाचे विशेष स्थान आहे. शनीचे परिवर्तन किंवा नक्षत्र बदलताना सर्व राशींवर परिणाम होतो. ज्योतिषशास्त्रात शनीच्या नक्षत्रात होणारा बदल खूप महत्त्वाचा मानला जातो. शनिदेव होळीनंतर नक्षत्र बदल करणार आहेत. शनिदेव भाद्रपद नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहेत. पूर्वा भाद्रपद नक्षत्रात गुरुचं वर्चस्व आहे. अशा स्थितीत शनिदेवाच्या नक्षत्रातील बदलाचा सर्व राशींवर नक्कीच काही ना काही प्रभाव पडणार आहे. शनिदेवाने नक्षत्र बदलताच काही राशींच्या लोकांचं भाग्य उजळणार आहे. शनीच्या नक्षत्र बदलामुळे कोणत्या राशींना मोठा फायदा होईल, हे जाणून घेऊया.

‘या’ राशींना होणार अपार धनलाभ?

मेष राशी

शनीच्या नक्षत्र परिवर्तनाचे मेष राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. जुन्या गुंतवणुकीतूनही नफा मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमची आर्थिक बाजू मजबूत होऊ शकते. यावेळी वडिलांसोबत तुमचे संबंध चांगले राहू शकतात. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. तुम्ही घर आणि वाहन खरेदी करू शकता. तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा देखील मिळण्याची शक्यता आहे. अविवाहित लोकांना यावेळी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.

Shani To Open Locker Of Money On Buddha Pornima on 23rd May
शनी खजिन्याचं कुलूप बुद्ध पौर्णिमेला उघडणार; ‘या’ ४ राशींना मिळणार मोठा वाटा, श्रीमंतीसह ‘हे’ लाभ करतील भरभराट
Shani Maharaj Finally To Leave Kumbh Rashi At 2025 Till 2027
शनी महाराज ‘या’ दिवशी घर सोडणार; २०२७ पर्यंत गुरुकडे राहून ‘या’ ३ राशींना देणार अपार संपत्ती; यश पायाशी घालेल लोटांगण
200 Years Later Shani Jayanti 2024 Nakshtra Gochar
चौफेर धनवर्षाव होणार! २०० वर्षांनी शनी जयंतीला ‘हा’ दुर्मिळ योगायोग; तीन राशींच्या कुंडलीत ‘या’ रूपात वसेल लक्ष्मी
shukra gochar 2024 venus transit in krittika nakshatra positive impact on these zodiac sign
शुक्रकृपेने सहा दिवसांनंतर ‘या’ ३ राशी होणार मालामाल!कृत्तिका नक्षत्रातील प्रवेशाने वाढेल मान-सन्मान अन् प्रतिष्ठा?
The rape victim cannot be forced to give birth to child
बलात्कारात पीडितेस अपत्य जन्माची सक्ती करता येणार नाही…
Shukra Nakshatra Parivartan
४८ तासांनी ‘या’ ४ राशींच्या धन व बँक बँलेन्समध्ये होणार बक्कळ वाढ? शुक्रदेवाच्या नक्षत्र बदलामुळे नशीब अचानक पालटणार
From May To August Shani Maharaj Walk With Golden Feet In Kundal
सोनपावलांनी शनी ‘या’ राशींच्या कुंडलीला देणार चमक; मे ते ऑगस्टमध्ये धनाने भरेल झोळी, आयुष्यात बदलाचा संकेत
May 2024 These Five Zodiac Signs Will Earn Money
लक्ष्मी येती घरा! १ मे पासून पाच राशींना प्रचंड धनलाभ, ‘ही’ असतील फायद्याची रूपं; तुमची रास आहे का नशीबवान?

(हे ही वाचा : एप्रिल सुरु होताच ‘या’ ६ राशींना लक्ष्मी बनवणार श्रीमंत? अनेक मोठे ग्रह करणार राशीमध्ये बदल, कुणाला होणार फायदा?)

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांना शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने फायदा होण्याची शक्यता आहे. अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. या काळात नोकरी किंवा व्यवसायात चांगले यश मिळवू शकाल. यासोबतच व्यवसायातही मोठा नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. या काळात या राशीच्या लोकांच्या बिझनेस डील पूर्ण होऊ शकतात. नवीन भागीदार मिळण्याची शक्यता आहे. या काळात आयुष्यातील अनेक संकटं दूर होऊ शकतात. 

मकर राशी

मकर राशीच्या लोकांना या काळात नशिबाची पूर्ण साथ मिळण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित लोकांची आर्थिक स्थिती सुधारू शकते. नोकरीत असलेल्यांना पदोन्नती आणि पगारवाढीचा लाभ मिळू शकतो. व्यापारात तुम्हाला मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसेही परत मिळू शकतात.  या राशीच्या लोकांची त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. शनिदेवाच्या कृपेने अचानक मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)