Shani In Purva Bhadrapada Nakshatra: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ज्योतिष शास्त्रात शनि ग्रहाला खूप महत्त्व दिलं जातं. वैदिक ज्योतिषशास्त्रात शनी महाराज हे कलियुगातील कर्म व न्याय देवता मानले जातात. याचा अर्थ असा की, मानवाला त्याच्या कर्मानुरूप न्याय व शिक्षा देण्याचे काम शनी महाराज करतात. एखाद्या व्यक्तीला दुःखातून सावरण्यासाठी किंवा दुःख सहन करायला लावण्यासाठी शनीचे त्याच्या कुंडलीतील अस्तित्व खूप महत्त्वाचे ठरते. ज्योतिषशास्त्रात शनिदेवांच्या स्थितीला खूप महत्त्व आहे. शनिदेव न्यायदेवता असल्याने त्यांची स्थिती खूप महत्त्वाची ठरते. वैदिक पंचांगानुसार, शनिदेव नक्षत्र बदल करणार आहेत. १८ ऑगस्टला म्हणजेच रक्षाबंधनच्या एक दिवस आधी शनिदेव पूर्वा भाद्रपद नक्षत्रात गोचर करणार आहे. शनिच्या या स्थितीचा राशीचक्रावर परिणाम दिसून येईल. काही राशींच्या मंडळींच्या नशिबाला वेगळीच चमक व झळाळी मिळू शकते. धन- दौलतीत प्रचंड वाढ होऊ शकते. अशा या नशीबवान राशी कोणत्या व त्यांना नेमका कसा फायदा होऊ शकतो हे पाहूया…

शनिदेवाची ‘या’ राशींवर कृपा?

मेष राशी (Mesh Zodiac)

शनीच्या नक्षत्र बदलाने मेष राशीच्या मंडळींना जीवनात सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. तुम्हाला तुमच्या ध्येयांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. पैसे कमावण्याचे नवीन मार्ग सापडू शकतात. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. शैक्षणिक कार्यात सुखद परिणाम दिसून येऊ शकतात. नोकरीसाठी हा काळ चांगला असून प्रगतीची शक्यता आहे. परदेश प्रवासाचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. घरात सुख-शांतीचे वातावरण राहू शकते.

(हे ही वाचा : ९ दिवसांनी ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत? बुधदेवाचे महागोचर होताच वाईट दिवस संपून धनलाभासह मिळू शकते नशिबाला कलाटणी)

मिथुन राशी (Mithun Zodiac)

शनीच्या नक्षत्र बदलाने मिथुन राशीच्या लोकांना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. रखडलेली कामं मार्गी लागू शकतात. या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनाही काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. व्यवसायातही भरपूर फायदा होण्याची शक्यता आहे. तुमच्या करिअरवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. यासोबतच तुम्ही संपत्ती जमा करण्यातही यशस्वी होऊ शकता. 

मकर राशी (Makar Zodiac)

शनी ग्रहाचे नक्षत्र बदल मकर राशीच्या लोकांसाठी वरदानच ठरु शकते. या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांना या काळात नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. प्रगतीचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. कोणत्याही व्यवसायाशी संबंधित असलेल्यांना चांगला सौदा मिळू शकतो. प्रलंबित असलेली महत्त्वाची कामं पूर्ण होऊ शकतात.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)