Shani Gochar 2024 : कर्मानुसार फळ देणारा शनि सर्वात हळू चालणारा ग्रह आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शनिला एका राशीतून दुसर्‍या राशीमध्ये प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षाचा कालावधी लागतो. अशात एका राशीमध्ये पुन्हा येण्यासाठी शनिला जवळपास ३० वर्षे लागतात. शनिच्या राशी परिवर्तनाचा परिणाम प्रत्येक राशीवर पडतो. या वेळी शनि त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीमध्ये विराजमान आहे ज्यामुळे शश नावाच्या राजयोगाचे निर्माण होत आहे. याला पंचमहापुरुषांच्या योगांपैकी एक राजयोग मानले जाते. जेव्हा २०२५ मध्ये शनि कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीमध्ये जाईल, तेव्हा ते नवीन राजयोग निर्माण करतील आणि काही राशींचे नशीब चमकतील. जाणून घेऊ या शनि द्वारा शश राजयोग निर्माण झाल्याने कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो.

वृषभ राशी (Vrishabha Zodiac)

या राशीमध्ये शनि दहाव्या स्थानावर विराजमान आहे. अशात हा राजयोग याच स्थानावर निर्माण होत आहे. या राशीच्या लोकांचा समाजात मान सन्मान वाढेल. अचानक धन लाभाचे योग निर्माण होईल. संपत्ती वाहन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. दीर्घ काळापासून अडकलेल्या इच्छा पूर्ण होतील. करिअरच्या क्षेत्रात सुद्धा खूप महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. आपल्या भविष्यावर चांगला परिणाम पडू शकतो. आत्मविश्वास, धाडसीपणा यामध्ये वृद्धी होईल. तसेच कमावण्याचे स्त्रोत वाढतील ज्यामुळे आर्थिक स्थिती सुद्धा उत्तम राहीन.

After 30 years Saturn-Venus alliance will happen
३० वर्षांनतर शनी-शुक्राची होणार युती! २०२५ मध्ये ‘या’ राशींची होणार चांदी, मिळणार अपार पैसा
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Dev deepawali 2024
देव दिवाळीपासून शनी-गुरूचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
mangal planet transit in cancer
‘या’ तीन राशीच्या लोकांना होणार आकस्मिक धनलाभ; पुढील १४२ दिवस मंगळाची असणार कृपा
Dev Diwali 2024
देव दिवाळीला गजकेसरी योगामुळे ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब उजळणार! अचानक धनलाभाचा योग, मिळेल पैसाच पैसा
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते जोडीदाराचा सहवास; तुमचा शनिवार जाणार का आनंद-उत्साहात? वाचा १२ राशींचे भविष्य
Shani Gochar 2025
शनीदेव देणार बक्कळ पैसा; २०२५ मध्ये ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा

हेही वाचा : Tulsi Vivah 2024 Date Time: १२ की १३, तुळशी विवाह नक्की कधी? जाणून घ्या योग्य तारीख, तिथी आणि शुभ मुहूर्त

धनु राशी (Dhanu Zodiac)

या राशीच्या तिसर्‍या स्थानावर शनि विराजमान आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांच्या आयुष्यातील सर्व समस्या समाप्त होऊ शकतात. आयुष्यात अनेक आव्हानाचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी सुरू असलेल्या समस्या समाप्त होऊ शकतात. आर्थिक स्थिती उत्तम राहीन. कर्जापासून मुक्तता मिळेल. दीर्घ काळापासून असलेली आरोग्याची समस्या दूर होऊ शकते.

हेही वाचा : Shukra Gochar 2024 : शुक्र करणार धनु राशीमध्ये प्रवेश, ‘या’ तीन राशींना मिळणार पैसाच पैसा, मिळेल प्रत्येक कामात यश

कुंभ राशी (Kumbha Zodiac)

या राशीच्या लग्न भावात शश राजयोग निर्माण होत आहे. याबरोबर या राशीमध्ये शनि साडे साती शेवटच्या टप्प्यावर आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांवर शनि देवाची विशेष कृपा दिसून येईल. दीर्घ काळापासून सुरू असलेली समस्या समाप्त होऊ शकते. अचानक धन लाभ होऊ शकतो. पद प्रतिष्ठा वाढू शकते. नोकरीच्या ठिकाणी प्रगती होईल. पगार वाढ होऊ शकते. व्यवसायाशी संबंधित लोकांना लाभ मिळू शकतो. न्यायालयीन प्रकरणात यश मिळू शकते. कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकता.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)