Shani Margi 2025 Horoscope: ज्योतिषशास्त्रात, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर दुसर्या राशीत प्रवेश करतो. ज्यावेळी ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला गोचर, मार्गी आणि वक्री असं म्हटलं जातं. ज्योतिषशास्त्रात शनीदेवाला खूप महत्त्व आहे, जे लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. सर्व ग्रहांमध्ये शनी हा सर्वात मंद गतीने जाणारा ग्रह आहे, एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी त्याला सुमारे अडीच वर्षे लागतात, त्यामुळे शनीला पुन्हा त्याच राशीत जाण्यासाठी ३० वर्षे लागतात. ज्योतिषशास्त्रानुसार, शनीने २९ मार्च २०२५ रोजी मीन राशीत प्रवेश केला. शनी ग्रह आता गुरुच्या मीन राशीत आहे. आता जुलैमध्ये शनीदेव वक्री होणार असून वर्षाच्या शेवटपर्यंत शनीदेव मार्गी स्थितीत राहणार आहेत, त्यामुळे शनीदेवाच्या कृपेने काही राशींचे सुखाचे दिवस सुरू होऊ शकतात. जाणून घेऊया कोणत्या तीन राशींना फायदा होणार आहे?
शनीदेव ‘या’ राशींचे भाग्य उजळवणार?
वृषभ
ज्योतिषशास्त्रानुसार शनीदेव मार्गी झाल्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. तुमच्या सुखसोयी वाढून आणि तुमची कमाईही चांगली होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये मोठे बदल घडून येऊ शकतात. नोकरदारांना बढती मिळण्याची शक्यता आहे. या काळात नोकरीच्या ठिकाणी मोठे पद मिळू शकते. व्यापाऱ्यांचा व्यवसाय वाढू शकतो. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होऊ शकते.
मिथुन
ज्योतिषशास्त्रानुसार शनीदेव मार्गी होताच मिथुन राशीच्या लोकांचे चांगले दिवस येऊ शकतात. या राशीच्या लोकांची शैक्षणिक आणि बौद्धिक क्षेत्रात प्रगती होऊ शकते. तुमच्यासाठी यशाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. व्यवसायात गुंतलेले लोक लाभ मिळवण्याच्या स्थितीत असतील. एखाद्या प्रकल्पात चांगले काम करण्याची संधी मिळू शकते. गुंतवणुकीतून तुम्हाला प्रचंड नफा मिळू शकतो. मान-सन्मानात वाढ होऊ शकते.
मीन
ज्योतिषशास्त्रानुसार शनीदेव मार्गी स्थितीत येताच तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळू शकतात. इतरांकडे अडकलेले आपले हक्काचे पैसे आता परत मिळू शकतात. शनीदेवांच्या कृपेनं नोकरीत प्रमोशनही मिळू शकतं. आता रखडलेली सर्व कामं मार्गी लागू शकतात. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळण्याची दाट शक्यता असते. व्यावसायिकांना या काळात नव्या डीलचा फायदा होऊ शकतो.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे, लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)