Saturn Transit 2025 Impact in Marathi: ज्योतिषशास्त्रात शनीदेवाला विशेष स्थान आहे. २९ मार्च २०२५ रोजी शनीने कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश केला आहे. शनी जेव्हा राशी बदलतो, तेव्हा तो कोणता ना कोणता पाय धारण करतो. ज्योतिषशास्त्रानुसार शनीचे चार पाय सोने, चांदी, तांबे आणि लोखंड असतात. शनीची ही पावले आपल्या स्थितीनुसार शुभ आणि अशुभ फळ प्रदान करतात. यापैकी तांब्याच्या पायाचा प्रभाव हा अत्यंत शुभ मानला जातो. शनीने मीन राशीत तांब्याचा पाय घेऊन प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, हे गोचर ३ जून २०२७ पर्यंत राहणार आहे, त्यामुळे शनीदेव पुढील काही काळ एका राशीच्या कुंडलीत तांब्याच्या पावलांनी भ्रमण करत आहेत, ज्यामुळे एका राशीच्या जीवनात मोठ्या उलाढाली होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या पुढील दोन वर्षांत काय बदलणार त्या राशीमध्ये…
या कालावधीत शनी दशम भावात प्रवेश करीत असून त्यांची तिसरी, सातवी आणि दहावी दृष्टी क्रमशः चतुर्थ, सप्तम व द्वादश भावावर राहणार आहे, त्यामुळे कामात अधिक मेहनत, जबाबदाऱ्या वाढणे आणि वैयक्तिक जीवनात बदल यांचा सामना या राशीच्या लोकांना करावा लागू शकतो.
करिअरवर परिणाम
शनीच्या प्रभावामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींवर कामाचा अधिक ताण जाणवू शकतो. ऑफिसमधील वातावरणात बदल होऊ शकतात, नवी जबाबदारी मिळू शकते. वरिष्ठांना जिंकण्यासाठी आणखी मेहनत घ्यावी लागेल. मात्र, ‘स्मार्ट वर्क’ने यशही तुम्हाला गाठता येईल.
व्यवसाय व आर्थिक स्थिती
मिथुन राशीच्या लोकांना व्यवसायात नवी संधी मिळण्याची शक्यता आहे. कष्टाचे फळ मिळेल. अचानक धनलाभाची शक्यता असूनही गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा अन्यथा नुकसान होऊ शकतो.
दाम्पत्य जीवन व प्रेमसंबंध
मिथुन राशीच्या लोकांचे प्रेमसंबंध या काळात चांगलं राहू शकते. अविवाहितांना विवाह प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी समजुतीने घेतलेले निर्णय सुखद ठरु शकतात.
पण…आरोग्याचा इशारा
आरोग्याच्या बाबतीत सावध राहा. त्वचारोग, यांसारख्या त्रासांना सामोरे जावे लागू शकते. आहार व जीवनशैलीत शिस्त पाळा.
काय घडू शकते २०२७ पर्यंत?
शनीच्या तांब्याच्या पायामुळे कुणाचं नशीब उजळेल, कुणाला जबाबदाऱ्या वाढतील तर कुणी आत्मविश्वासाने नवीन टप्पा गाठेल. मात्र एक नक्की, मेहनत हीच यशाची गुरुकिल्ली ठरणार आहे…!
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)