Shani Gochar 2025 : शनीदेव विशिष्ट कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र बदल करत असतो, ज्याचा परिणाम १२ राशींच्या जीवनावर दिसून येतो. शनीदेवाला कर्मफळदाता मानले जाते. शनीदेव वर्षातून एकदा नक्षत्र परिवर्तन करतात, यामुळे २७ नक्षत्रांमधून गेल्यानंतर त्याच नक्षत्रात परत येण्यासाठी सुमारे २७ वर्षे लागतात. २०२४ च्या अखेरीस म्हणजेच डिसेंबर महिन्यात, शनी ग्रहाने गुरु-शासित पूर्वभाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला आणि २८ एप्रिल २०२५ पर्यंत तो या नक्षत्रात राहील. पूर्वाभाद्रपद नक्षत्रात शनीचा प्रवेश झाल्यामुळे काही राशींच्या लोकांना भरपूर लाभ मिळू शकतात, तर अनेक राशीच्या लोकांना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. पूर्वाभाद्रपद नक्षत्रात शनीच्या प्रवेशामुळे कोणत्या राशींना समस्या येऊ शकतात ते जाणून घेऊया…

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी शनीचे नक्षत्र परिवर्तन नुकसानकारक ठरू शकते. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक समस्या उद्भवू शकतात. अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. अनपेक्षित समस्या, ताण किंवा अडथळे उद्भवू शकतात. तुम्हाला या काळात बराच त्रास होऊ शकतो. मार्च २०२५ मध्ये शनी मीन राशीत प्रवेश करेल. या काळात कर्क राशीच्या लोकांच्या आयुष्यात पुन्हा आनंद निर्माण होऊ शकतो.

Shani Gochar 2025
पुढील ४७ दिवस शनी देणार नुसता पैसा; ‘या’ राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकणार अन् नवी नोकरी मिळणार
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Guru Margi 2025
Guru Margi 2025 : पुढचे ७० दिवस गुरूच्या कृपेने ‘या’ चार राशी होतील मालामाल, मिळेल मनाप्रमाणे , पगार, धनसंपत्ती, अन् प्रेम
saturn rise in meen
‘या’ तीन राशींना शनी देणार बक्कळ पैसा; मीन राशीतील उदय दुर्भाग्य करणार दूर अन् देणार प्रमोशनसह प्रत्येक कामात यश
shani gochar 2025 uttarashada nakshatra
Shani Gochar 2025 : २७ वर्षांनंतर शनिचा नक्षत्र बदलाने ‘या’ राशींचे लोक जगतील राजासारखे जीवन, भासणार नाही पैसा अन् संपत्तीची कमतरता
budh uday 2025 today horoscope
Budh Uday 2025 : बुधाच्या उदयाने ‘या’ राशींच्या लोकांच्या नशिबाला मिळणार कलाटणी; व्हाल कोट्याधीश अन् जगाल आनंदी जीवन
Laxmi Narayan Yog 2025 budh shukra gochar
Laxmi Narayan Yog 2025 : १२ महिन्यांनंतर लक्ष्मीनारायण योगाने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसा व प्रेम; २७ फेब्रुवारीला जगण्याला मिळेल नवे वळण
saturn transit 2025
येणारे ५६ दिवस शनी देणार गडगंज श्रीमंती; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे प्रेम संबंध अन् आर्थिक स्थिती सुधारणार

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी शनीचा पूर्वाभाद्रपद नक्षत्रातील प्रवेश अडचणी निर्माण करू शकतो. या काळात सिंह राशीच्या लोकांना आर्थिक नुकसान पोहोचू शकते. आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. तुम्हाला अनपेक्षित अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. कुटुंब आणि मित्रांबरोबर एखाद्या गोष्टींवरून तणाव निर्माण होऊ शकतो. यासह आयुष्यात अनेक समस्या येऊ शकतात. म्हणून धीर धरणे खूप महत्त्वाचे आहे.

आयआयटीमधून शिक्षण, कोट्यावधींचा पगार; पण सर्व गोष्टींचा त्याग करून ‘हे’ १० उच्च शिक्षित बनले संन्यासी साधू

मकर

पूर्वाभाद्रपद नक्षत्रात शनीचा प्रवेश मकर राशीच्या लोकांसाठी खूप त्रासदायक ठरू शकतो. या राशीच्या लोकांना मानसिक आणि शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. यासह तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. पण, हे सर्व तुम्ही योग्यरित्या करू शकता असे नाही. आरोग्याबाबत समस्या जाणवू शकतात. यासाठी खूप खर्च येणार आहे. तुम्हाला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते.

(टीप – वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader