Shani Gochar 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रात, शनी हा नऊ ग्रहांपैकी सर्वांत शक्तिशाली ग्रह मानला जातो. कारण- तो कर्मफलदाता म्हणून ओळखला जातो; जो प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार शुभ आणि अशुभ फळ देतो, असे मानले जाते. त्यामुळे शनीच्या स्थितीतील बदलाने १२ राशींच्या लोकांच्या जीवनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या परिणाम होत असतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनी देव अडीच वर्षांनी राशिबदल करतो. शनीच्या राशिबदलाप्रमाणेच नक्षत्रबदलानेही १२ राशींच्या जीवनावर निश्चितच शुभ-अशुभ परिणाम होत असतात. शनी सध्या पूर्वा भाद्रपद नक्षत्रात स्थित आहे; परंतु २८ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजून ५२ मिनिटांनी शनी उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करील. शनीच्या या नक्षत्रबदलाने कोणत्या राशींच्या लोकांना भरपूर फायदे मिळू शकतात ते जाणून घेऊ…
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, न्यायाचा देव शनी सध्या कुंभ राशीत आहे; पण २९ मार्च रोजी तो गुरूच्या मीन राशीमध्ये प्रवेश करेल. अशा परिस्थितीत उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करताना, शनी मीन राशीत स्थित असेल.
तूळ
शनीचा उत्तरा भाद्रपद नक्षत्रातील प्रवेशाने तूळ राशीच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होऊ शकते. त्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवू शकता. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल, तसेच तुमच्या कामाचे तुम्हाला योग्य फळ मिळू शकेल. जीवनात आनंदाचे अनेक क्षण येऊ शकतात. तुम्ही आळस सोडू पुन्हा जोमाने कामाला लागाल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. त्यामुळे शनीच्या कृपेने तुमचे भाग्य उजळू शकते; पण या काळात तुम्हाला आरोग्याची थोडी काळजी घ्यावी लागेल.
वृश्चिक
शनी उत्तरा भाद्रपद नक्षत्रातील प्रवेश वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मकता घेऊन येईल. या राशीच्या लोकांच्या घरात सुरू असलेले वाद संपतील आणि सुख-शांती नांदेल. तुमचे वैवाहिक जीवन चांगले जाणार आहे. त्याशिवाय तुम्ही तुमच्या पसंतीच्या व्यक्तीशी लग्नदेखील करू शकता. तुम्हाला नोकरी बदलण्याची चांगली संधी मिळू शकते. मुलांची प्रगती होईल. उत्पन्नातही झपाट्याने वाढ होणार आहे. आर्थिक गुंतवणुकीतून तुम्हाला खूप चांगले परतावे मिळू शकतात. आर्थिक स्थिती चांगली असेल आणि तुम्ही संपत्ती जमा करण्यातही यशस्वी व्हाल.
मकर
मकर राशीच्या लोकांसाठी शनीचा उत्तरा भाद्रपद नक्षत्रातील प्रवेश सर्वांत फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या लोकांना प्रवासाच्या अनेक संधी मिळतील. परदेश प्रवासाचीही शक्यता आहे. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. मुलांची प्रगती होऊ शकते. तसेच तुम्ही मित्रांनाही भेटू शकता. बौद्धिक क्षमता वेगाने वाढू शकते. आरोग्य चांगले राहणार आहे. व्यवसायात तुम्ही उचललेले धोकादायक पाऊल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.