Premium

शनिदेव दोन वर्ष मकरसह ‘या’ राशींच्या लोकांना देणार बक्कळ पैसा? साडेसातीपासून मुक्ती मिळून होऊ शकता लखपती

दोन वर्ष शनिदेवाची ‘या’ राशींवर विशेष कृपा असणार आहे. कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी जाणून घेऊया…

Shani Gochar
शनिदेवाची 'या' राशींवर कृपा? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Shani Gochar 2023: शनिदेवांना कर्माचा दाता म्हणतात. अशी मान्यता आहे की, शनिदेव व्यक्तीच्या चांगल्या-वाईट कर्मांचा हिशेब ठेवतात आणि त्यानुसारच व्यक्तीला शुभ-अशुभ फळ मिळतं. न्यायदेवता किंवा कर्मदाता शनी एका राशीत किमान अडीच वर्ष वास्तव करत असतो.  शनिदेवाला एक राशी चक्र पूर्ण करण्यासाठी ३० वर्षे लागतात. शनिदेव २९ मार्च २०२५ रोजी रात्री ०१ वाजून ०१ मिनिटांनी आपल्या स्वराशी कुंभ मधून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करणार आहेत. या राशीत शनिदेव २ जून २०२७ पर्यंत असणार आहेत. शनिदेवाने मीन राशीत प्रवेश केल्याने अनेक राशींची साडेसातीपासून सुटका होणार आहे. चला तर पाहूया शनिदेवाच्या गोचराने कोणत्या राशींचे भाग्य उजळू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शनिदेव ‘या’ राशींचे भाग्य पालटणार?

सिंह राशी

सिंह राशीतील लोकांना तब्बल दोन वर्ष सुखाचे दिवस अनुभवता येऊ शकतात. शनिदेवाची या काळात विशेष कृपा असू शकते. या लोकांना नोकरी व्यवसायात लाभ मिळू शकतो. या काळात त्यांना भरपूर नफा मिळू शकतो. वैवाहिक जीवन चांगलं राहू शकेल. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. सामाजिक आदरात वाढ होऊ शकेल.

(हे ही वाचा : १९ ऑक्टोबरपासून मिथुनसह ‘या’ राशींचे सुखाचे दिवस? सूर्य आणि बुधदेवाच्या युतीमुळे घरात येऊ शकतो गडगंज पैसा )

तूळ राशी

तूळ राशींच्या लोकांसाठी शनिदेवाचे गोचर चांगले ठरु शकते. जर या राशीतील लोकांना परदेशात नोकरी किंवा शिक्षण घ्यायचे असेल तर तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. या काळात व्यवसायाशी संबंधित लोक चांगली कामगिरी करु शकतील. ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता असून समाजात सन्मान देखील वाढू शकतो. नशिबाने साथ दिल्याने रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात आणि सरकारी योजनांचाही चांगला फायदा होऊ शकतो. 

मकर राशी

शनिदेवाची दोन वर्ष मकर राशींच्या मंडळीवर विशेष कृपा असू शकते. या काळात या राशीतील लोकांना लोकांना सुख, समृद्धी आणि आनंदी जीवन जगायला मिळू शकते. या काळात नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतील. दुसरीकडे, रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांना चांगली बातमी मिळू शकते. 

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shani gochar 2025 saturn transit pisces these three zodic signs bank balance to raise money marathi astrology pdb

First published on: 23-09-2023 at 15:01 IST
Next Story
Chanakya Niti: आयुष्यात यशस्वी व्हायचे आहे? मग आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या ‘या’ चार गोष्टी ठेवा लक्षात