Shani Gochar 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतात. तसेच याव्यतिरिक्त ग्रह वक्री आणि मार्गी देखील होतात. ज्योतिषशास्त्रानुसार, शनी सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे, जो एका राशीत किमान अडीच वर्षं राहतो. १२ राशींचे संपूर्ण राशीचक्र पूर्ण करण्यासाठी त्याला साधारण ३० वर्षांचा कालावधी लागतो.

ज्योतिषशास्त्रानुसार, शनीने २९ मार्च २०२५ रोजी मीन राशीत प्रवेश केला असून तो १३ जुलै २०२५ पासून वक्री होणार आहे. शनीची ही वक्री अवस्था काही राशींसाठी लाभदायी तर काही राशींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल.

शनी ‘या’ तीन राशींना करणार मालामाल

मेष (Mesh Rashi)

मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा वक्री शनी खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा होईल. त्यामुळे या काळात अचानक धनलाभ, भौतिक सुखाची प्राप्ती होईल. अनेक दिवसांपासून अडकलेले कामही पूर्ण होण्यास मदत मिळेल. नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल. प्रेमप्रकरणांमध्ये जोडीदाराबरोबर आनंदाचे क्षण व्यतीत कराल.

सिंह (Singh Rashi)

सिंह राशीच्या व्यक्तींना शनीची ही चाल भाग्यकारी ठरेल. हा या काळ तुमच्यासाठी भौतिक सुखाची प्राप्ती करून देणारा असेल. या युतीच्या प्रभावाने तुमच्या आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. धार्मिक कार्यात अधिक रस निर्माण होईल. धन-संपत्ती प्राप्त होईल. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान प्राप्त होईल. तीर्थक्षेत्रांना आवर्जून भेट द्याल. या काळात तुमचे नशीब तुमच्या बाजूने असेल.

कुंभ (Kumbha Rashi)

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी शनीची वक्री चाल खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. पैशांची तंगी दूर होण्यास मदत होईल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. या काळात आई-वडील आणि तुमच्या गुरूंचा आर्शीवाद तुमच्या पाठीशी असेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकार्यांकडून मदत मिळेल. अचानक धनलाभ होईल. शत्रूंवर विजय मिळवाल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)