Shani Gochar 2026 : शनीच्या बदलत्या स्थितीचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यावर पडत असतो. शनीला न्याय आणि कर्माची देवता मानले जाते. ऑक्टोबरच्या सुरुवातीला शनीने उत्तर भाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला होता. पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत शनी याच नक्षत्रात गोचर करणार आहेत. सध्या शनी वक्र दृष्टीने भ्रमण करत आहेत. शनीच्या या स्थितीमुळे अनेकांच्या अडचणी वाढू शकतात, मात्र उत्तर भाद्रपद नक्षत्रातील प्रवेशाने ५ राशींना प्रचंड लाभ मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया की, या ५ भाग्यशाली राशी कोणत्या आहेत आणि पुढील १०० दिवसांत त्यांच्या आयुष्यात कोणते सकारात्मक बदल पाहायला मिळतील?

शनी गोचरमुळे ‘या’ ५ राशींना होणार लाभ

वृषभ

आजपासून पुढील १०० दिवस वृषभ राशीच्या लोकांना नोकरीमध्ये मोठा दिलासा मिळू शकेल. जर बऱ्याच काळापासून एखाद्या महत्त्वाच्या कामात अडथळे येत असतील, तर आता त्यात हळूहळू सुधारणा दिसून येईल. नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात, ज्या भविष्यात फायदेशीर ठरतील. जबाबदाऱ्या वाढतील, परंतु धैर्याने आणि मेहनतीने काम केल्यास हीच गोष्ट भविष्यात मोठा नफा मिळवून देऊ शकेल.

मिथुन

पुढील काही दिवस मिथुन राशीच्या लोकांची मानसिक धावपळ आणि गुंतागुंत बऱ्याच अंशी कमी होणार आहे. वैयक्तिक आयुष्यात जर एखादी गोष्ट वारंवार त्रास देत असेल, तर त्यात आराम मिळेल. काही जुनी रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. पैशांच्या बाबतीत कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करणे योग्य राहील. या काळात नोकरीविषयी एखादी आनंदाची बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे.

तूळ

तूळ राशीच्या लोकांना पुढील १०० दिवस त्यांच्या करिअरमध्ये उत्तम प्रगती पाहायला मिळेल. या राशीच्या लोकांना वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य लाभेल. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांना एखादा चांगला पर्याय मिळू शकतो. नोकरीत पदोन्नतीची (प्रमोशन) शक्यतादेखील निर्माण होत आहे. यासह आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे आत्मविश्वासात वाढ होईल.

मकर

शनीच्या गोचरमुळे पुढील १०० दिवस मकर राशीच्या लोकांना अत्यंत अनुकूल परिणाम मिळतील. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामाची योग्य ओळख मिळेल. कामाचे कौतुक झाल्यामुळे मन प्रसन्न राहील. व्यवसाय करणाऱ्यांची प्रगती चांगली होईल. नवीन ग्राहक मिळाल्यामुळे मनाला शांतता लाभेल. उत्पन्नाचे अनेक नवे स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजू मजबूत होईल आणि रखडलेली कामे मार्गी लागतील.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांच्या अडचणी बऱ्याच अंशी कमी होतील. पुढील १०० दिवसांच्या आत परिस्थिती वेगाने सुधारत जाईल. ज्या गोष्टींची चिंता बऱ्याच काळापासून भेडसावत होती, त्या आता हळूहळू संपुष्टात येतील. जर नवीन नोकरीचा शोध सुरू असेल, तर आगामी काळात उत्तम संधी मिळू शकतात. व्यवसाय विस्तारेस लागेल. साडेसातीचा शेवटचा टप्पा असल्याने थोडा प्रभाव राहू शकतो, त्यामुळे संयम बाळगणे आवश्यक आहे.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)