Shani Gochar: शनी देवांना ज्योतिषशास्त्रात न्याय देणारा आणि कर्मानुसार फळ देणारा ग्रह मानले जाते. अशी मान्यता आहे की, शनी व्यक्तीला त्याच्या चांगल्या-वाईट कर्मांनुसार फळ देतात. त्यामुळे शनीच्या चालीत किंवा नक्षत्रातील बदलाचा परिणाम सर्व १२ राशींवर होऊ शकतो.

ऑक्टोबरच्या सुरुवातीला शनीने उत्तराभाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला होता. ते पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत याच नक्षत्रात राहणार आहेत. सध्या शनी वक्री अवस्थेतही आहेत. अशा परिस्थितीत शनीची ही स्थिती काही राशींसाठी लाभदायक ठरू शकते. येणारे १०० दिवस या राशींसाठी नवीन संधी आणि प्रगतीचे मार्ग खुले करू शकतात. चला जाणून घेऊया, या काळात कोणत्या राशींना फायदा होण्याची शक्यता आहे.

वृषभ राशी (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी येणारा काळ करिअर आणि कामाच्या दृष्टीने खूप चांगला ठरू शकतो. नोकरीत प्रगतीच्या नवीन संधी मिळू शकतात. बराच काळ अडकलेली कामे पूर्ण झाल्यामुळे मन आनंदी राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची आणि कौशल्याची दखल घेतली जाऊ शकते. नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि त्या तुम्ही यशस्वीपणे पार पाडाल. येत्या काळात तुमच्या प्रयत्नांना चांगले यश मिळू शकते. यशाचे नवीन मार्ग खुले होण्याची शक्यता आहे.

मिथुन राशी (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी पुढील १०० दिवस आनंद आणि दिलासा देणारे ठरू शकतात. वैयक्तिक आयुष्यातील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अडचणी दूर होण्याची शक्यता आहे. अपूर्ण राहिलेली अनेक कामे पूर्ण होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना करिअरमध्ये पुढे जाण्याच्या नवीन संधी मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी केलेल्या मेहनतीचे फळ मिळू शकते. या काळात एखादी आनंदाची बातमीही मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीतही फायदा होऊ शकतो. मात्र, गुंतवणुकीसंबंधी निर्णय विचारपूर्वक घेतल्यास अधिक लाभदायक ठरेल.

तूळ राशी (Libra Horoscope)

तुळ राशीच्या लोकांसाठी शनीची ही स्थिती करिअरमध्ये प्रगतीचे नवीन मार्ग उघडू शकते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली संधी मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पदात बदल होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीतही सुधारणा होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे आर्थिक चिंता कमी होतील आणि आत्मविश्वास वाढेल.

मकर राशी (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी पुढील १०० दिवस मेहनतीचे चांगले फळ देणारे ठरू शकतात. नोकरी करणाऱ्यांच्या कामाचे कौतुक होऊ शकते. नवीन जबाबदाऱ्याही मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसाय वाढवण्याच्या नवीन संधी मिळतील. नवीन ग्राहक मिळाल्यामुळे व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. बराच काळ अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होऊ शकते.

कुंभ राशी (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी पुढील १०० दिवस सकारात्मक बदल आणि दिलासा देणारे ठरू शकतात. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अडचणी हळूहळू कमी होऊ शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसाय पुढे नेण्यासाठी नवीन संधी मिळतील. आर्थिक बाबतीतही सुधारणा होण्याचे संकेत आहेत. कुंभ राशीवर सध्या शनीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. त्यामुळे संयम आणि समजूतदारपणे निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. सातत्याने मेहनत करत राहा, कारण येणाऱ्या काळात तुमच्या प्रयत्नांचे चांगले फळ मिळू शकते.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्यातिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)