Shani Gochar: २०२६ मध्ये शनीचे कोणतेही गोचर होणार नाही. मात्र, २०२७ मध्ये शनी तब्बल २९ वर्षांनंतर आपल्या नीच राशी असलेल्या मेष राशीत प्रवेश करणार आहेत. ३ जून २०२७ रोजी शनी मेष राशीत गोचर करतील आणि या राशीत सुमारे अडीच वर्षे राहतील.
२०२७ मध्ये शनी मेष राशीत करणार गोचर
वैदिक पंचांगानुसार, याआधी शनी १७ एप्रिल १९९८ रोजी मेष राशीत आले होते. ज्योतिषाचार्य नरेंद्र उपाध्याय यांच्या मते, मेष राशीतील शनीचा प्रभाव संमिश्र मानला जातो. कारण शनी या राशीत नीच मानले जातात. मेष राशीचा स्वामी मंगळ असून मंगळ आणि शनी यांच्यात शत्रुत्वाचे संबंध आहेत. त्यामुळे या काळात शनी कमकुवत स्थितीत असतात.
या गोचरादरम्यान लोकांमध्ये हट्टीपणा किंवा घाईघाईने निर्णय घेण्याची प्रवृत्ती वाढू शकते. मात्र, शनी हे न्यायाचे देवता असल्यामुळे जे लोक प्रामाणिकपणे आणि मेहनतीने काम करतात, त्यांना ते चांगले फळ देतात. मेष राशीतील शनीचा प्रभाव देश, जग आणि सर्वसामान्यांच्या जीवनावरही पडू शकतो.
पंडित नरेंद्र उपाध्याय यांच्या मते, शनी मेष राशीत नीच असले तरी प्रत्येकालाच वाईट परिणाम मिळतील, असे नाही. जन्मकुंडलीतील शनीची स्थिती कशी आहे, यावर शुभ-अशुभ फळ अवलंबून असते. चला जाणून घेऊया, मेष राशीतील शनीच्या गोचरामुळे कोणत्या राशींना लाभ होऊ शकतो.
मेष राशीतील शनी गोचर म्हणजे तांत्रिक बदलांचा काळ
पंडित नरेंद्र उपाध्याय यांच्या मते, मेष राशीतील शनीचे गोचर तांत्रिक प्रगतीला चालना देणारे ठरू शकते. याआधी २९ वर्षांपूर्वी शनी मेष राशीत आले होते, तेव्हा तंत्रज्ञानाचा झपाट्याने विकास झाला होता. विशेषतः इंटरनेटसारख्या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला होता.
मेष राशीतील शनीच्या गोचरामुळे ‘या’ ४ राशींना होऊ शकतो धनलाभ
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. प्रामाणिकपणा आणि शिस्तबद्ध कामामुळे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खुश होतील. व्यवसायात प्रगती होईल. परदेश प्रवासाचे योग जुळू शकतात. कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल. महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीसाठी हा काळ शुभ ठरू शकतो. नोकरीत लाभ मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन करार किंवा मोठा व्यवहार करण्याची संधी मिळू शकते. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीच्या चांगल्या संधी मिळतील आणि त्यातून फायदा होईल. एखाद्या महत्त्वाच्या कामात यश मिळू शकते.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीसाठी हा काळ सकारात्मक परिणाम देणारा ठरू शकतो. शनीच्या कृपेने नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. उत्पन्न वाढू शकते आणि नवीन मार्गांनी धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल, त्यामुळे मानसिक समाधान मिळेल. संततीकडून सहकार्य मिळेल. करिअरमध्ये चांगले बदल दिसून येतील. आत्मविश्वास वाढेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीसाठी मेष राशीतील शनीचे गोचर शुभ मानले जात आहे. या काळात तुमचे एखादे मोठे स्वप्न पूर्ण होऊ शकते. शत्रूंवर विजय मिळेल. कोर्ट-कचेरीच्या प्रकरणांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. जुने वाद मिटू शकतात. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. महत्त्वाचे निर्णय योग्य प्रकारे घेण्यात यश मिळेल.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्यातिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
