Shani Transit: ९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७:२८ वाजता शनी गोचर करत उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या चौथ्या चरणात प्रवेश करणार आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनीची बदललेली चाल अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सध्या शनी रेवती नक्षत्राच्या पहिल्या चरणात विराजमान आहेत. पंडित नरेंद्र उपाध्याय यांच्या मते, नक्षत्र बदलताच शनी एकूण ५ राशींसाठी आशेचा किरण ठरणार आहेत. शनीचे राशी किंवा नक्षत्र परिवर्तन प्रत्येक राशीवर खोल परिणाम करत असते.
या गोचरामुळे पुढील १२२ दिवस कन्या आणि तुळ राशीसह एकूण ५ राशींच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसून येतील. ऑक्टोबर महिन्यापासूनच या राशींच्या लोकांना चांगल्या गोष्टींची सुरुवात झाल्याचे जाणवेल. चला तर मग जाणून घेऊया, शनीच्या या गोचरामुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे.
वृषभ राशी (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यातही शनी गोचरामुळे सकारात्मक बदल दिसून येतील. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि कामात चांगली प्रगती होईल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. व्यवसाय करणाऱ्यांनाही दीर्घकालीन फायदा मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन राशी (Gemini Horoscope)
शनीचे हे नक्षत्र परिवर्तन मिथुन राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. पुढील १२२ दिवस आर्थिक बाबतीत अनेक सकारात्मक घडामोडी होतील. पैशांबाबत काही अडचणी किंवा तणाव असेल तर तो दूर होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि प्रत्येक क्षेत्रात नशिबाची साथ मिळेल.
कन्या राशी (Virgo Horoscope)
शनीच्या या बदलाचा सकारात्मक परिणाम कन्या राशीच्या लोकांनाही दिसून येईल. उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होतील आणि कामात हळूहळू प्रगती होईल. व्यवसाय करणाऱ्यांची अशा व्यक्तींशी भेट होईल, ज्यांच्यामुळे भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो.
मकर राशी (Capricorn Horoscope)
मकर ही शनीची स्वतःची रास असल्यामुळे या राशीच्या लोकांना पुढील १२२ दिवस अनेक बाबतीत लाभ मिळण्याची शक्यता आहे. पुढील काही आठवडे त्यांच्यासाठी खूप चांगले ठरतील. मालमत्तेशी संबंधित कामांमध्ये प्रगती होईल आणि अनेक कामे यशस्वीपणे पूर्ण होतील.
तुळ राशी (Libra Horoscope)
तुळ राशीच्या लोकांना शनीच्या या गोचरामुळे चांगले लाभ मिळतील. इतरांच्या मदतीने एखादे रखडलेले काम पूर्ण होईल, त्यामुळे मन आनंदी राहील. मात्र, बचत आणि खर्च यामध्ये योग्य समतोल राखणे गरजेचे आहे.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
