Shani Gochar: ज्योतिषशास्त्रात शनीला कर्मफळ देणारा आणि न्यायाची देवता मानलं जातं. शनीच्या हालचालींमध्ये होणारे बदल आणि नक्षत्र परिवर्तन यांचा परिणाम सर्व १२ राशींवर होत असल्याची ज्योतिषशास्त्रात मान्यता आहे. सध्या शनी मीन राशीत असून उत्तर भाद्रपद नक्षत्रात विराजमान आहे. ज्योतिषीय गणनेनुसार, शनी पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत याच नक्षत्रात राहणार आहे. त्यामुळे आगामी १०० दिवस काही राशींसाठी विशेष फायदेशीर ठरू शकतात.

नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या लोकांना या काळात काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. रखडलेली कामं मार्गी लागू शकतात, तर करिअरमध्येही नवीन संधी मिळू शकतात. चला तर जाणून घेऊया, कोणत्या पाच राशींसाठी शनीचं हे नक्षत्र परिवर्तन शुभ ठरू शकतं.

वृषभ राशी (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी पुढील १०० दिवस करिअरच्या दृष्टीने चांगले ठरू शकतात. नोकरीमध्ये येणाऱ्या अडचणी हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यावसायिकांना नवीन संधी मिळण्याचे संकेत आहेत. केलेल्या मेहनतीचं फळ मिळाल्यामुळे आत्मविश्वास वाढू शकतो. मात्र, यश मिळवण्यासाठी संयम ठेवणं गरजेचं असेल.

मिथुन राशी (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांना जुन्या समस्यांमधून दिलासा मिळू शकतो. वैयक्तिक आयुष्यात सुरू असलेला गोंधळ कमी होण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून अपूर्ण असलेली कामं पूर्ण होऊ शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. आर्थिक व्यवहार करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. तसेच अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा.

तूळ राशी (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी शनीचं नक्षत्र परिवर्तन करिअरमध्ये प्रगतीच्या संधी घेऊन येऊ शकतं. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्या लोकांना चांगल्या संधी मिळू शकतात. प्रमोशन आणि पगारवाढीचेही संकेत आहेत.

मकर राशी (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम पाहायला मिळू शकतात. नोकरीमध्ये केलेल्या कामाचं कौतुक होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना नवीन ग्राहक मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले झाल्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होऊ शकते. बऱ्याच दिवसांपासून रखडलेली कामंही पुढे सरकू शकतात.

कुंभ राशी (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आगामी काळ काहीसा दिलासादायक ठरू शकतो. नोकरी आणि व्यवसायातील अडचणी कमी होण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगल्या संधी मिळू शकतात. मात्र, कुंभ राशीच्या लोकांवर साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू असल्याने काही बाबतीत संयम ठेवावा लागेल.

उत्तर भाद्रपद नक्षत्रातील शनीच्या गोचराचं महत्त्व

ज्योतिषशास्त्रानुसार, उत्तर भाद्रपद नक्षत्राचा संबंध स्थिरता, संयम, गंभीर विचार आणि आध्यात्मिक चिंतनाशी जोडला जातो. या नक्षत्राचा स्वामी शनी असल्यामुळे शनीचं या नक्षत्रातील वास्तव्य महत्त्वाचं मानलं जातं.

शनीची चाल संथ असल्यामुळे त्याचा प्रभाव दीर्घकाळ राहतो, अशी ज्योतिषशास्त्रात मान्यता आहे. मात्र, शनीच्या गोचराचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जन्मकुंडलीतील शनीचं स्थान आणि महादशा-अंतर्दशा यांनुसार वेगवेगळा असू शकतो.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्यातिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)