Shani Vakri 2023 Effects: शनीदेव हे कलियुगातील न्यायाधिकारी म्हणून ओळखले जातात. शनी मुळात मकर, कुंभ, या राशींचे स्वामी असले तरी त्यांना प्रत्येक राशीला आपल्या कर्मानुसार फळ देण्याची जबाबदारी दिलेली आहे असे ज्योतिष अभ्यासक सांगतात. शनीची वक्र दृष्टी राजाचा रंक तर शनीचा आशीर्वाद हा रंकाचा राजा बनवू शकतो असा भक्तांचा विश्वास आहे. आपल्याला माहित असेल की २०२३ च्या सुरुवातीला शनिदेव स्वराशीत विराजमान झाले होते. मार्च महिन्यात याच कुंभ राशीत शनिदेव अस्त व उदय झाले होते. आता जून महिन्यात १७ तारखेला शनिदेव वक्री अवस्थेत येणार असल्याचे समजत आहे.

वैदिक ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार १७ जून २०२३ ला रात्री १० वाजून ४८ मिनिटांनी शनी वक्री होणार आहेत तर ४ नीव्हेम्बर २०२३ ला सकाळी ९ वाजून १५ मिनिटांपर्यंत शनीदेव उगाच स्थितीत असणार आहेत. शनीच्या या वक्री १२ राशींवर दिसून येऊ शकतो पण काही अशा राशी आहेत ज्यांना प्रचंड धनलाभासह विशेष प्रगतीची संधी चालून येणार आहे. या भाग्यवान राशी कोणत्या हे पाहूया …

20th April Panchang Marathi Horoscope 12 Zodiac Signs
२० एप्रिल पंचांग: शनिवारी अद्भुत योगायोग १२ राशींना ‘या’ रूपात लाभाचे संकेत; तुम्हाला कशी प्राप्त होईल लक्ष्मीकृपा?
guru asta 2024
१४ दिवसांनी गुरु होणार अस्त! ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; नोकरीपासून प्रेमापर्यंत प्रत्येक कामात मिळू शकते यश
Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : पौर्णिमेच्या दिवशी शुक्र गोचर पालटणार नशीब, ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा
19 April Panchang & Rashi Bhavishya Marathi
१९ एप्रिल पंचांग: कामदा एकादशीला लक्ष्मी नारायण मेष ते मीनपैकी तुमच्या राशीला धनलाभ कसा देणार? वाचा राशी भविष्य

शनीदेव वक्री होऊन ‘या’ राशींना बनवणार करोडपती?

मेष रास (Aries Zodiac)

शनी वक्री मेष राशीच्या मंडळींना प्रचंड मोठा लाभ मिळवून देणार आहे अशी चिन्हे आहेत. येत्या काळात तुम्हाला एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या माध्यमातून तुम्हाला धनलाभाची संधी आहे पण तुम्हाला . तुम्हाला आतापर्यंत आयुष्यात ज्या अडचणींचा सामना करावा लागला होता त्या कष्टाचे फळ तुम्हाला एखाद्या बलाढय रूपात मिळू शकते. कामाच्या ठिकाणी इतरांशी वाईटपणा घेऊ नका उलट तुमच्या कामाने टीकाकारांचे तोंड बंद करू शकता.

वृषभ रास (Taurus Zodiac)

वृषभ राशीला अप्रत्यक्ष धनलाभाचे योग आहेत. याचा अर्थ तुम्हाला थेट कोणती लॉटरी लागेल असे नाही उलट तुम्हाला प्रचंड धनलाभ मिळवून देणारी एखादी स्थिती निर्माण होऊ शकते जसे की तुम्हाला नव्या नोकरीची संधी येऊ शकते, गुंतवणुकीचा योग आहे. तुम्हाला निर्णय घेऊन तुमच्या लाभावर शिक्कामोर्तब करता येईल. बँक बॅलन्स वाढल्याने तुम्हाला आनंदी आनंद मिळू शकतो. आयुष्यात समृद्ध करणारा एक काळ अनुभवता येऊ शकतो. सिंगल मंडळींना प्रेमाचा मानून सापडू शकतो.

मिथुन रास (Gemini Zodiac)

मिथुन राशीला शनीच्या उलट्या पावली चालण्याचा मोठा फायदा होऊ शकतो. आपली अडकून पडलेली कामे मार्गी लागल्याने अडकून पडलेले धन सुद्धा प्राप्त होऊ शकते. परदेश प्रवासाचे योग आहेत. आर्थिक लाभ मिळाल्याने तुम्हाला आवश्यक गोष्टींची खरेदी करता येऊ शकते. समाजात तुमचे काम गौरवले जाऊ शकते.

सिंह रास (Leo Zodiac)

शनीच्या प्रवासात सिंह राशीच्या मंडळींना लॉटरी प्रमाणे अनपेक्षित व अचानक धनलाभ होण्याची संधी आहे. तुम्हाला आयुष्यात हवेहवेसे सुख मिळू शकते. समाजात तुमचे पद व प्रतिष्ठा वाढून तुम्हाला अभिमान अनुभवता येऊ शकतो. एखाद्या नव्या व्यवसायाची संधी येऊ शकते. तसेच तुमचे प्लॅन प्रत्यक्ष साकारण्यासाठी हा फायद्याचा काळ ठरू शकतो.

हे ही वाचा<< ‘या’ दिवशी गुरुपुष्यमृत योग बनून तुमची रास होणार गडगंज श्रीमंत? विष्णू-लक्ष्मी कृपेने होऊ शकता कोट्याधीश

मकर रास (Capricorn Zodiac)

मकर राशीचे मूळ स्वामीच शनीदेव आहेत. त्यामुळे शनीच्या कोणत्याही चालीमुळे आपल्या राशीला फायदा होऊ शकतो. प्रॉपर्टीमधील गुंतवणूक आपल्याला लाभदायक ठरू शकते. कौटुंबिक सुखाने तुमचे दिवस सुंदर बनू शकतात. पैसे वाचवणे हीच तुमची कमाई ठरू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)