Shani Guru Kendra Yog 2025 Impact in Marathi: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांमध्ये शनीला कर्मदेव म्हणून ओळख आहे. प्रत्येक राशीला त्यांच्या कर्मानुरूप फळ देण्याचे काम शनीदेव करतात. अनेकदा शनीची दृष्टी ही नकारात्मक मानली जात असली तरी चांगल्या कर्मानुसार शनीदेव न्याय देण्याचेसुद्धा काम करतात, म्हणूनच त्यांची दुसरी ओळख न्यायदेवता अशीसुद्धा आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रहांची स्थिती आणि त्यांचे परस्पर योग महत्त्वपूर्ण मानले जातात. अशाच एका दुर्मीळ योगाचे आपण लवकरच साक्षीदार होणार आहोत. सध्या शनी महाराजांचे राशीपरिवर्तन मीन राशीत झाले आहे आणि जून २०२७ पर्यंत ते या राशीत राहतील. ज्यामुळे अनेक राजयोग तयार होत राहतील. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, १५ जून रोजी संध्याकाळी ७:५७ वाजता शनी-गुरु एकमेकांपासून ९० अंशांवर असतील, ज्यामुळे केंद्र योग तयार होत आहे. या योगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या लोकांना भरपूर लाभ मिळू शकतो. चला जाणून घेऊया या भाग्यवान राशींबद्दल…
शनी-गुरु बनवणार केंद्र योग; ‘या’ राशींच्या व्यक्तींना मिळणार पैसाच पैसा?
मेष
शनी देवगुरुच्या कृपेने मेष राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. या काळात उत्पन्नाचे नवीन सोर्स उपलब्ध होऊ शकतात. व्यापाऱ्यांना मोठा नफा मिळू शकतो. तुमच्या संचित संपत्तीतही वाढ होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीतही काही सकारात्मक बदल होऊ शकतात. तुमच्या जीवनात सुख-समृद्धी नांदू शकते. या राशीच्या लोकांना लॉटरी लागण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांचा समाजात मान सन्मान वाढू शकतो.
कर्क
शनी देवगुरुच्या कृपेने कर्क राशीच्या लोकांना सुखाचे दिवस पाहता येऊ शकतात. तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार चांगले परिणाम मिळू शकतात. आर्थिक दृष्टिकोनातूनही हा काळ फायदेशीर ठरू शकतो. गुंतवलेल्या पैशातही फायदा होऊ शकतो. नोकरदार वर्गातील लोकांच्या कामाची चांगली प्रशंसा होऊ शकते. आपल्या खांद्यावर मोठी जबाबदारी येण्याची शक्यता असून त्यासह तुम्हाला धनलाभाचेसुद्धा योग जुळून येऊ शकतात. आरोग्याच्या सर्व तक्रारी दूर होऊ शकतात.
मकर
शनी देवगुरुच्या कृपेने या राशीच्या व्यक्तींना लाभदायक फायदे मिळू शकतात. या राशीतील लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी नवनवीन संधी आपले दार ठोठावू शकतात. तुमचे वास्तव्याचे ठिकाण पुढील काही काळासाठी बदलण्याची शक्यता आहे. तुम्हाला शेअर बाजारातील गुंतवणुकीतून अपार संपत्तीचे धनी होता येऊ शकते. या कालावधीत आत्मविश्वास वाढल्याने तुमच्या व्यक्तिमत्त्वाला झळाळी मिळू शकते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे, लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)