Shani Guru Navpancham Rajyog 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनीला कर्मदाता आणि न्यायाचा देवता मानले जाते. शिवाय तो सर्वात मंद गतीने फिरतो. तो एका राशीत साधारण अडीत वर्षे राहतो आणि सतत कुठल्या ना कुठल्या ग्रहाशी युती करत अशतो. सध्या शनी मीन राशीत वक्री आहे आणि ११ डिसेंबर रोजी मार्गी होईल. त्यामुळे तो कुठल्या ना कुठल्या ग्रहाशी युती किंवा दृष्टी ठेवत राहील. त्यामुळे शुभ आणि अशुभ दोन्ही योग निर्माण होतील. कर्मदाता शनी देवांचा गुरू असलेल्या गुरूसोबत सप्टेंबरमध्ये युती करून नवपंचम राजयोग तयार करेल. हा राजयोग काही विशिष्ट राशींच्या लोकांना विशेष लाभ देऊ शकतो. प्रलंबित कामे पूर्ण होण्यासोबतच पद आणि प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते. तर मग जाणून घेऊया कोणत्या तीन राशींना विशेष लाभ मिळू शकतो…

वैदिक पंचांगानुसार, १ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजून ३९ मिनिटांनी गुरू आणि शनी एकमेकांपासून १२० अंशांवर असतील, त्यामुळे नवपंचम राजयोग निर्माण होईल. या वेळी शनी मीन राशीत आणि गुरू कर्क राशीत असेल.

कर्क राशी

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी गुरू आणि शनीचा नवपंचम राजयोग अनेक क्षेत्रांमध्ये अनुकूल ठरू शकतो. या राशीत गुरू उच्च राशीत असून लग्न स्थानात आहे, तर शनी नवव्या स्थानात वक्री आहे. परिणामी, या राशीच्या व्यक्तींची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात, तसंच त्यांना त्यांच्या नोकरी आणि व्यवसायात प्रचंड यश मिळू शकते. तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल आणि तुम्ही आत्मपरीक्षण कराल. त्यामुळे तुमच्यामध्ये महत्त्वाचे बदल घडू शकतात. समाजात तुमचा आदर वाढू शकतो. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकता. सोबतच नोकरदार व्यक्तींना नवीन संधी मिळू शकतात. मानसिक ताणही कमी होऊ शकतो.

तूळ राशी

तूळ राशीच्या गोचर कुंडलीत शनी सहाव्या घरात आणि गुरू दहाव्या घरात आहे. परिणामी या राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोगाचा अनेक क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. या काळात नवीन प्रकल्प सुरू करणे फायदेशीर ठरू शकते. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे किंवा योजना पुन्हा सुरू होऊ शकतात. कौटुंबिक समस्या संपुष्टात येऊ शकतात. शिवाय जीवनात मान आणि सन्मान वाढण्याची शक्यता आहे. भौतिक सुखसोयी मिळण्याचीही शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रचंड यश तसंच आर्थिक लाभही मिळू शकतो. आर्थिक परिस्थितीत चांगली असेल.

मीन राशी

मीन राशीसाठी शनीच्या वक्री गतीचा अनेक राशींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. या राशीच्या लग्नस्थानात शनी वक्री आहे आणि त्याचा स्वामी गुरू, उच्च राशीत असून पाचव्या घरात विराजमान आहे. त्यामुळे गुरू आणि शनीच्या युतीने तयार झालेला नवपंचम राजयोग या राशीच्या लोकांसाठी अनेक अनुषंगाने महत्त्वाचा ठरू शकतो. शिक्षण क्षेत्रात सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. विद्यार्थ्यांना उत्कृष्ट यश मिळू शकते. तसंच संसती होण्याचीही शक्यता आहे.

व्यवसाय आणि नोकरीबाबत महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर निर्णय घेऊ शकता. नशीब तुम्हाला साथ देऊ शकते, त्यामुळे तुम्ही अनेक क्षेत्रांमध्ये यशस्वी होऊ शकता. प्रतिष्ठा आणि दर्जा मिळण्याची शक्यता आहे.