Margi shani 2024: ज्योतिषशास्त्रानुसार देवगुरू बृहस्पतीदेखील निश्चित कालावधीनंतर आपलं राशी परिवर्तन किंवा नक्षत्र परिवर्तन करतात. गुरू जवळपास एक वर्ष एका राशीत राहतो, ज्याचा प्रभाव प्रत्येक राशीच्या व्यक्तींवर विविध प्रकारे पाहायला मिळतो. सध्या गुरू वृषभ राशीत विराजमान असून तो यावर्षी याच राशीत असेल. तसेच कर्मफळदाता शनीदेखील एका राशीत जास्त काळ राहतो. ज्योतिषशास्त्रानुसार, गुरू सध्या वृषभ राशीत वक्री अवस्थेत असून १६ नोव्हेंबर रोजी शनी स्वराशी असलेल्या कुंभ राशीत मार्गी होणार आहे. या दोन्ही ग्रहांमधील बदल काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत शुभ फळ देतील.

तीन राशींसाठी सुखाचे दिवस

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

मेष

मेष राशीच्या व्यक्तींसाठी शनीची मार्गी अवस्था आणि गुरूची वक्री अवस्था खूप लाभदायी सिद्ध होणार आहे. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. धनलाभ होईल. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. समाजात मान-सन्मान वाढेल. करिअरमध्ये हवे तसे यश मिळवता येईल. सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. भाग्याची चांगली साथ मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम होईल. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. आरोग्यही चांगले राहील.

वृषभ

शनीची मार्गी अवस्था आणि गुरूची वक्री अवस्था वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. या काळात समस्यांपासून सुटका होईल. या राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. वाहन, मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण कराल. धार्मिक स्थळांना भेट द्याल. कुटुंबात आनंदी आनंद होईल. समाजात मान-सन्मान प्राप्त होईल. ताणतणाव दूर होण्यास मदत होईल, मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. अडकलेले पैसा परत मिळतील. गुरूच्या कृपेने पैशांची बचत करणे फायदेशीर ठरेल.

हेही वाचा: सूर्य करणार मालामाल; वृश्चिक राशीतील राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा

कर्क

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी शनीची मार्गी अवस्था आणि गुरूची वक्री अवस्था अत्यंत लाभदायी ठरेल. या काळात आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. बँक बॅलन्स वाढेल. करिअर आणि व्यवसायात मनासारखे यश प्रस्थापित कराल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या अडकलेले पैसे परत मिळतील. वैवाहिक जीवनात सुखमय क्षण व्यतीत कराल. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कामाच्या ठिकाणच्या नव्या जबाबदाऱ्या पार पाडाल. धार्मिक तीर्थस्थळांना आवर्जून भेट द्याल.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader