Shani Dev News : शनिदेवाला कर्मदाता मानले जाते. शनि कर्मानुसार व्यक्तीला फळ देतो. शनिदेव २९ मार्च २०२५ रोजी राशी परिवर्तन करणार आहे. या दिवशी शनिदेव कुंभ राशीतून वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार. २८ मार्च २०२५ पर्यंत शनि कुंभ राशीमध्ये आहे. शनि कुंभ राशीमध्ये विराजमान असल्यामुळे काही राशींवर या लोकांचा फायदा दिसून येईल.काही राशींवर शनि देवाची कृपा दिसून येईल. (shani in kumbh rashi will be lucky for zodics signs)
शनिदेवाचा शुभ व अशुभ असा दोन्ही परिणाम व्यक्तीच्या जीवनावर दिसून येतो. जाणून घेऊ या २८ मार्च २०२५ पर्यंतचा काळ कोणत्या राशींसाठी शुभ ठरणार आहे आणि कोणत्या राशींच्या लोकांवर शनिदेवाची कृपा दिसून येईल.
मेष राशी
मेष राशीच्या लोकांचा मान सन्मान वाढणार. या आठवड्यात निराश मानसिकता नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा. या लोकांनी व्यवसायात नवीन दिशेवर ध्यान केंद्रित करा. हा आठवडा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. जुन्या मित्रांबरोबर भेट होईल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. मेष राशीसाठी हा काळ उत्तम आहे.
मिथुन राशी
२८ मार्चपर्यंत मिथुन राशीच्या लोकांच्या लोकांवर शनिदेवाची कृपा दिसून येईल. या लोकांना कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण जाणवणार. यांचा अडकलेला पैसा परत मिळणार. आर्थिक अडचणी दूर होतील. आर्थिक वृद्धी होईल. तुम्ही कुटुंबातील सदस्यांबरोबर देव दर्शनाला जाऊ शकता. या राशीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल.
सिंह राशी
सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ उत्तम राहील. अडकलेला पैसा परत मिळू शकतो. या लोकांनी त्यांच्या कामावर लक्ष केंद्रीत करावे. या लोकांनी मेहनत करावी आणि लाभ घ्यावा. या लोकांनी देणे घेण्याचे व्यवहार नीट करावे. कामाच्या ठिकाणी अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल. हे लोक कलेची आवड जोपासणार. व्यवसायांसाठी हा चांगला काळ आहे. या लोकांच्या मान सन्मानात वृद्धी होईल. वरीष्ठ काम पाहून आनंदी होईल. या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो तसेच शुभ वार्ता मिळू शकते.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)
© IE Online Media Services (P) Ltd