Shani Jayanti 2022: ३० वर्षांनंतर शनि जयंतीला बनतोय दुर्मिळ योग, ‘या’ ३ राशींना होऊ शकतो फायदा

ही शनि जयंती ३ राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकते. चला जाणून घेऊया या राशींबद्दल…

Shani Rashi Parivartan
प्रातिनिधिक फोटो

Shani Jayanti 2022: यावेळी ३० मे रोजी शनि जयंती साजरी केली जाणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातूनही शनि जयंती खूप महत्वाची मानली जाते. यावेळी शनि जयंतीला सर्वार्थ सिद्धी योगही तयार होत आहे. यामुळे या दिवशी उपाय केल्यास दुहेरी फळ मिळेल. तसेच, ही शनि जयंती ३ राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकते. चला जाणून घेऊया या राशींबद्दल…

सर्वार्थ सिद्धी योग

यावेळी सर्वार्थ सिद्धी योग शनि जयंतीच्या दिवशी सकाळी ०७.१३ पासून सुरू होईल आणि मंगळवार, ३१ मे रोजी पहाटे ५.२७ पर्यंत राहील. शनि जयंतीला शनिदेवाची कृपा मिळवायची असेल तर या मुहूर्तावर पूजा करणे तुमच्यासाठी खूप शुभ राहील. दुसरीकडे, शनिदेव देखील या दिवशी त्यांच्या मूळ त्रिकोण राशीत कुंभ राशीत राहतील, जो जवळपास ३० वर्षांनंतर तयार होणारा योग आहे.

(हे ही वाचा: १२ जुलैपासून ‘या’ तीन राशींच्या लोकांवर राहील शनिची कृपादृष्टी; प्रत्येक कामात मिळणार यश)

धनु (Sagittarius)

शनी जयंती तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. कारण धनु राशीच्या लोकांना साडे सातीपासून मुक्ती मिळाली आहे. त्यामुळे तुमच्यासाठी प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. दुसरीकडे, शनिदेव तुमच्या तिसऱ्या घरामध्ये म्हणजेच पराक्रमी घरामध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे या काळात तुमची शक्ती आणि धैर्य वाढेल. यासोबतच तुम्हाला कामाच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. त्याच वेळी, आपण कोणत्याही जुन्या रोगापासून मुक्त होऊ शकता.

(हे ही वाचा: Shani Dev: शनिदेव ग्रह बदलणार, या ३ राशींना होऊ शकतो विशेष लाभ)

वृषभ (Taurus)

शनि जयंती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण तुमच्या दशम भावात शनिदेवाचे संक्रमण झाले आहे. ज्याला कार्यक्षेत्र आणि नोकरीची जाण असे म्हणतात. म्हणून, यावेळी तुम्ही व्यवसायात चांगले पैसे कमवू शकता. करिअरमध्ये यश मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.

(हे ही वाचा: Astrology: ‘या’ राशीच्या लोकांना असते जास्त बोलण्याची सवय! अनेकदा करून घेतात स्वतःचं नुकसान)

मेष (Aries)

शनि जयंती तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकते.कारण शनिदेव तुमच्या आकराव्या भावात संक्रमण करत आहेत, जे लाभ आणि उत्पन्नाचे स्थान आहे. त्यामुळे या काळात तुम्ही व्यवसायात चांगली कमाई करू शकता. तसेच, या काळात तुम्ही काही स्त्रोतांकडून पैसे कमवाल. व्यवसाय आणि करिअरमध्ये अपेक्षित यश मिळू शकते. दुसरीकडे, शनिदेव तुमच्या दहाव्या घराचा स्वामी आहे, त्यामुळे यावेळी तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते.

(हे ही वाचा: Zodiac Sign: ‘या’ दोन राशींच्या व्यक्तींचं नेहमीच एकमेकांशी जुळतं, विचारही पटतात!)

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shani jayanti 2022 will be special for these zodiac signs definitely do this work on may 30 ttg

Next Story
१२ जुलैपासून ‘या’ तीन राशींच्या लोकांवर राहील शनिची कृपादृष्टी; प्रत्येक कामात मिळणार यश
फोटो गॅलरी