Shani Jayanti 2026: ज्योतिषशास्त्रात शनीला खूप महत्वपूर्ण ग्रह मानले जाते. शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता देखील म्हटलं जातं. शनी नेहमीच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीना शुभ फळ प्रदान करतो. तर इतरांना विणाकारण त्रास देणाऱ्या आणि वाईट कर्म करणाऱ्यांवर शनीचा नकारात्मक प्रभाव पडतो. याव्यतिरिक्त शनीचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तनही खूप खास मानले जाते. शनी सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे; त्यामुळे त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षाचा कालवधी लागतो. तसेच वेळोवेळी तो नक्षत्र परिवर्तनही करतो.

दरम्यान, शनी जयंती हा धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या एक विशेष दिवस असून, तो १६ मे २०२६ रोजी साजरा केला जाईल. या दिवशी, ग्रहांचा राजा सूर्य आणि ग्रहांचा राजकुमार बुध हे वृषभ राशीत युती करतील, ज्यामुळे ‘बुधादित्य राजयोग’ निर्माण होईल. ज्योतिषशास्त्रानुसार, बुधादित्य राजयोग हा जीवनात सुख, समृद्धी, धन आणि ऐश्वर्य आणणारा एक अत्यंत शुभ योग मानला जातो. या वेळी बुधादित्य राजयोगाच्या शुभ प्रभाव १२ पैकी काही राशींवर होईल.

‘बुधादित्य राजयोग’ देणार भरभरून सुख-संपत्ती

वृषभ (Vrushabh Rashi)

वृषभ राशीच्या व्यक्तींना ‘बुधादित्य राजयोग’ खूप लाभदायी ठरेल. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. आरोग्य चांगले राहील. आयुष्यात मानसन्मान आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. व्यापारी वर्गाला प्रत्येक कामात यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात हवे तसे यश मिळेल.

कर्क (Kark Rashi)

कर्क राशीच्या व्यक्तींना ‘बुधादित्य राजयोग’ खूप सकारात्मक फळ देणारा ठरणार आहे. या काळात भाग्याची पूरेपूर साथ मिळेल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील, करिअरमध्ये हवे तसे यश मिळविता येईल. व्यवसायात हवी तशी प्रगती पाहायला मिळेल. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येतील. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. आर्थिक बाजू भक्कम होईल. या काळात तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल.

कन्या (Kanya Rashi)

कन्या राशीच्या व्यक्तींना ‘बुधादित्य राजयोग’ अत्यंत लाभदायी ठरेल. या काळात नव्या कामाची सुरुवात होईल. कामातील अडथळे दूर होतील. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. तुमचे प्रेमसंबंध चांगले होतील, नात्यात गोडवा येईल.

वृश्चिक (Vruschik Rashi)

वृश्चिक राशीच्या लोकांना या काळात तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

मकर (Makar Rashi)

मकर राशीच्या व्यक्तींसाठी ‘बुधादित्य राजयोग’ खूप सकारात्मक सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात आरोग्य उत्तम राहील. धार्मिक यात्रा कराल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)