Guru Transit In Rohini Nakshatra: दैत्यगुरू बृहस्पती हे प्रत्येक राशीच्या कुंडलीत कोणत्या ना कोणत्या मार्गाने प्रभाव टाकत असतात. गुरु बृहस्पती हे राशी परिवर्तनासह नक्षत्र गोचर सुद्धा करत असतात. सध्या गुरु हे कृत्तिका नक्षत्रात विराजमान आहेत. तर १३ जूनला म्हणजेच शनी जयंतीनंतर ७ दिवसांनी गुरु महाराज हे रोहिणी नक्षत्रात गोचर करणार आहेत. गुरूच्या रोहिणी नक्षत्रातील प्रवेशामुळे काही राशींच्या मंडळींना विशेष लाभ प्राप्त होऊ शकतो. रोहिणी हे २७ नक्षत्रांपैकी चौथे नक्षत्र आहे. याचे स्वामी चंद्र आहेत. गुरुदेव या नक्षत्रात पुढील २ महिने व ७ दिवस वास्तव्य करून २० ऑगस्टला संध्याकाळी ५ वाजून २२ मिनिटांनी परिवर्तनासाठी सज्ज होतील. या दोन महिन्यांचा काळ काही राशींसाठी सुख- समृद्धी, धन- संपत्ती व उत्तम आरोग्य घेऊन येणार आहे. या राशी कोणत्या हे पाहूया..

गुरु नक्षत्र गोचरामुळे चमकणार ‘या’ राशींचे नशीब

मेष रास (Aries Rashi Bhavishya)

मेष राशीसाठी गुरुचे नक्षत्र परिवर्तन फायद्याचे ठरू शकते. गुरु हे मेष राशीचे स्वामी असल्याने या मंडळींना मनसोक्त आनंद अनुभवता येईल. आर्थिक मिळकतीचे मार्ग खुले होतील. गुरु आपल्या राशीच्या कुंडलीत धन भावी असणार आहेत त्यामुळे पैशांची बाजू भक्कम राहील. रोगांपासून मुक्ती मिळेल. गुप्त शत्रू तुमच्यावर हल्ला करू शकतील पण गुरुबळाने त्यांच्यावर मात करू शकाल. भाग्य जोडीला असेल. व्यवसाय व नोकरीच्या ठिकाणी प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील.

Akkalkot, guru purnima, devotees,
अक्कलकोटमध्ये गुरूपौर्णिमेसाठी लाखाहून जास्त भाविक दाखल
Rahu Gochar 2024
शनीच्या प्रभावामुळे १० पटीने अधिक शक्तीशाली झाला राहू, ‘या’ राशीच्या लोकांचे आयुष्य बदलणार, नव्या नोकरीबरोबर मिळेल धन-संपत्ती
Horoscope sun By entering the Pushya Nakshatra
चार दिवसांनंतर सूर्याचा जबरदस्त प्रभाव; पुष्य नक्षत्रातील प्रवेशाने ‘या’ तीन राशीधारकांना मिळणार बक्कळ पैसा
Navpancham Rajyog
गुरुपौर्णिमेनंतर अडीच दिवस ‘या’ ३ राशी कमावतील प्रचंड धन व सन्मान; नवपंचम राजयोग बनताच ‘या’ रूपात दार ठोठावेल लक्ष्मी
Idol Conservation at Jotiba Temple from Saturday Darshan closed till Thursday
जोतिबा मंदिरात शनिवारपासून मूर्ती संवर्धन; गुरुवारपर्यंत दर्शन बंद
In the month of July Venus will change the zodiac sign twice
बक्कळ पैसा कमावणार… जुलै महिन्यात शुक्र करणार दोन वेळा राशी परिवर्तन; ‘या’ चार राशीच्या व्यक्तींना मिळणार भौतिक सुख अन् ऐश्वर्य
Jupiter's nakshatra transformation these five zodiac sign
आता नुसती चांदी! गुरूच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ पाच राशीधारकांना मिळणार पद, प्रतिष्ठा अन् पैसा
30th June Mararthi Panchang & Rashi Bhavishya
३० जून पंचांग: शनी महाराज झाले वक्री, आजचा सर्वार्थ सिद्धी योग मेष ते मीन राशींच्या नशिबाला कशी देईल कलाटणी?

मिथुन रास (Gemini Rashi Bhavishya)

मिथुन राशीच्या कुंडलीत बाराव्या ठिकाणी गुरु देव स्थिर असणार आहेत. या राशीला सुद्धा मुबलक धनसंपत्तीचा साठा गुरु देऊन जाणार आहे. वाहन किंवा प्रॉपर्टीच्या खरेदीचे योग आपल्या नशिबात आहेत. आई वडिलांच्या किंवा एखाद्या मार्गदर्शकाच्या माध्यमातून आपल्याला धनप्राप्ती होऊ शकते. रखडून पडलेल्या कामाला गती लाभेल. मानसिक ताण तणाव दूर होईल. नव्या नोकरीची संधी चालून येऊ शकते.

हे ही वाचा<< ७ जून पंचांग: दिवसभर कमाई ते इच्छा पूर्ती; वृषभ, कन्या सहित आज १२ पैकी या राशींना धनलाभाचे योग, वाचा तुमचं राशी भविष्य

कर्क रास (Cancer Rashi Bhavishya)

कर्क राशीच्या मंडळींसाठी रोहिणी नक्षत्रच मुळात लाभदायक आहे आणि त्यात गुरूचा प्रवेश म्हणजे दुग्धशर्करा योग म्हणता येईल. धन भावी गुरुचे आगमन झाल्याने धन संपत्तीत येणारे अडथळे दूर होतील. वडील, गुरु, वरिष्ठ अशा मंडळींच्या रूपात तुम्हाला लाभाचे संकेत आहेत. आपल्या सल्ल्याचे लोक पालन करतील व त्यामुळे अन्य राशींना सुद्धा लाभ होऊ शकेल परिणामी समाजातील आपले स्थान भक्कम होऊन मान- सन्मान वाढीस लागेल. संततीसुख अनुभवाल. जोडीदारासह ताळमेळ सुधारेल, आरोग्याला सुद्धा सुदृढता लाभेल.

(टीप: वरील लेख हा सामान्य ज्ञान व गृहीतके यातून प्राप्त माहितीवर आधारित आहे)