Shani Jayanti 2024: कलियुगातील न्याय व कर्मदेवता शनी महाराज यांची येत्या जून महिन्यातील पहिल्याच आठवड्यात जयंती असणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार, ६ जूनला धनी जयंती असणार असून त्यादिवशी शनी देव तब्बल पाच राशींवर सुखाचा वर्षाव करणार आहेत. आयुष्यातील दुःख व कष्टाचा काळ मागे सारून ही मंडळी अनेक महिन्यांनी पहिल्यांदाच आनंद व शांतता अनुभवणार आहेत. शनी जयंतीबद्दल थोडक्यात सांगायचं तर ज्येष्ठ मासातील अमावस्येला शनी जयंती असते, या तिथीवर शनी महाराजांचा जन्म झाला होता असे मानले जाते. यादिवशी शनीची पूजा करून तेल अर्पण करण्याची रीत आहे. यंदाच्या शनी जयंतीला मेष, वृषभ, मिथुनसहित पाच राशींना नोकरी, व्यायसाय, वैवाहिक आयुष्य यामध्ये मोठे बदल झाल्याचे जाणवू शकते. या पाच राशी कोणत्या व त्यांना शनी महाराज कोणत्या रूपात लाभ घडवून देणार हे पाहूया..

शनी जयंतीला ‘या’ पाच राशी होतील धनी

मेष रास

मेष राशीच्या मंडळींवर शनी देवाची कृपा असणार आहे. आपल्याला करिअरच्या अनुषंगाने प्रचंड मोठी झेप घेता येईल असे बदल आजचा दिवस घडवू शकतो. पदोन्नती व पगारवाढीचा योगायोग जुळून आल्याने डोक्यावरील आर्थिक भार कमी होईल तसेच समाजातील मान-सन्मान वाढीस लागेल. आपल्याला सरकारी योजनांचा लाभ होऊ शकतो. तुमचे संपर्क मजबूत होतील. आर्थिक गुंतवणूक फायद्याची ठरू शकते. या दिवसांमध्ये कुणाशीही उगाच वैर पत्करू नका.

वृषभ रास

शनी जयंतीच्या दिवशी तुम्हाला कष्टाचे फळ मिळणार आहे. तुम्ही आजपर्यंत ज्या गोष्टीसाठी प्रचंड मेहनत घेतलीत ते कार्य पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींची तर या दिवसापासून चांदी होणार आहे. कामाचा विस्तार वाढेल व बरोबरीने आर्थिक मिळकत सुद्धा द्विगुणित होत जाईल. करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळू शकते. अर्थाजनाचे नवे मार्ग मोकळे होतील. यश प्राप्तीची वाट सुकर होईल.

मिथुन रास

साडेसाती संपल्याने मिथुन राशीवर शनी महाराजांची कृपा आहेच. आपल्याला शनी जयंतीपासून धनलाभ व यशाचे मार्ग गवसतील. कठीण परीक्षांमध्ये यश हाती लागेल. पराक्रमात वाढ होईल. व्यवसायात उत्तम डील प्राप्त होईल. आपली आर्थिक स्थिती सुधारल्याने डोक्यावरील कर्जाचा ताण कमी होईल. कामाच्या ठिकाणी नेहमीपेक्षा जरा वेगळ्या मार्गाने आपल्याला हव्या त्या गोष्टी प्राप्त करून घ्याव्या लागतील. विचारपूर्वक निर्णय घेण्याचा प्रयत्न करा, हुरळून जाऊ नका.

कन्या रास

शनी जयंतीचा दिवस हा कन्या राशीसाठी बँक बॅलन्स, प्रॉपर्टी यासारख्या भौतिक सुखांना घेऊन येणार आहे. अचानक धनलाभ झाल्याने मन आनंदी असेल. चोरी झालेली किंवा हरवलेली एखादी मौल्यवान वस्तू अनपेक्षितपणे पुन्हा प्राप्त होऊ शकते. या दिवसापासून तुमच्या आयुष्याचं आनंदी पर्व सुरु होणार आहे. कुटुंबात सुख- शांती लाभेल, नात्यांमधील गैरसमजूती दूर होऊ शकतात.

हे ही वाचा<< २०२५ पर्यंत शनी ‘या’ राशींचे धनी होणार! गडगंज श्रीमंती व सुखाने न्हाऊन निघाल, वाचा, तुम्हालाही मिळणार का पेढे वाटण्याची संधी

वृश्चिक रास

वृश्चिक रशूच्या मंडळींना आयुष्यात सुख व समृद्धी अनुभवता येऊ शकते. आर्थिक चणचण कमी होऊ शकते.शनीच्या कृपेने सरकारी कामे पूर्ण होतील. मार्गातील अडथळे दूर होतील. संकटांमधून कर्तृत्वाने बाहेर पडण्याचा मार्ग शोधाल ज्यामुळे स्वतःवरील विश्वास वाढीस लागेल. नव्या व्यवसायात गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. धनवृद्धीसाठी तुमचा जोडीदार माध्यम ठरू शकतो. या दिवशी केलेली गुंतवणूक लाभदायक ठरू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)