Shani Mangal and Budh Yuti In Meen Rashi: ज्योतिषशास्त्रात मंगळाला भूमी, ऊर्जा आणि उत्साहाचा कारक ग्रह मानले जाते. तर बुध ग्रहाला वाणी, विद्या आणि बुद्धिचा कारक ग्रह मानले जाते. तसेच शनी ग्रह न्यायाचा आणि कर्मफळदाता म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते; ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. पंचांगानुसार, ०२ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ०३ वाजून ३७ मिनिटांनी मंगळ ग्रह मीन राशीत प्रवेश करणार असून ११ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्री ०१ वाजून २० मिनिटांनी याच राशीत बुध गोचर करेल. मीन राशीत आधीपासून शनी ग्रह देखील उपस्थित आहे. ज्यामुळे मीन राशी मंगळ, बुध आणि शनी ग्रहाची युती निर्माण होईल. या युतीचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल.
त्रिग्रही योगाचा ‘या’ राशींवर शुभ प्रभाव
मेष (Mesh Rashi)
मेष राशीच्या व्यक्तींसाठी मंगळ-बुधाची युती खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. भाग्याची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल असेल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल. कर्ज कमी होण्यास मदत होईल. दूरचे प्रवास घडतील. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे.
मकर (Makar Rashi)
मंगळ-बुधाच्या युतीमुळे मकर राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. भौतिक सुख प्राप्त होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील.
कन्या (Kanya Rashi)
मंगळ-बुधाच्या युतीचे कन्या राशीच्या व्यक्तींना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील, आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे.
मीन (Meen Rashi)
मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा योग खूप अनुकूल असेल. धन-संपत्तीत प्रचंड वाढ होईल. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. त्यामुळे आजपर्यंत जे अशक्य वाटत होते, ते शक्य करून दाखवाल. या लोकांच्या आयुष्यात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. करिअर-व्यवसायात भरपूर प्रगती होईल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होईल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
