Shani-Mangal Yog 2026: उत्तर भारतात श्रावण महिना ३० जुलै रोजी सुरू होणार आहे. त्यामुळे उत्तर भारतातील पहिला श्रावणी सोमवार ३ ऑगस्ट रोजी असेल. ज्योतिषशास्त्रामध्ये शनीला कर्म फळदाता आणि न्यायाचा कारक ग्रह म्हणून ओळखले जाते. शनी नवग्रहातील ग्रहांमध्ये सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करण्यासाठी शनीला जवळपास अडीच वर्षाचा कालावधी लागतो. तर ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाला साहस, पराक्रम, शौर्य, क्रोध, भूमी यांचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ शुभ स्थितीत असतो, असे लोक प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी सक्षम असतात.
पहिल्या श्रावणी सोमवारी शनी-मंगळ ग्रहाचा अद्भुत संयोग निर्माण होणार आहे. शनी-मंगळ ग्रहाचा अद्भुत संयोग नक्कीच १२ पैकी काही राशींच्या लोकांसाठी वरदान ठरेल.
शनीदेव ‘या’ राशींना मालामाल करणार
मिथुन (Mithun Rashi)
शनी-मंगळ ग्रहाचा अद्भुत संयोग मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरेल. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. समाजात मान-सन्मान वाढेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. जोडीदाराला वेळ द्याल. मानसिक तणावातून मुक्त रहाल. आयुष्यात आनंदी आनंद असेल.
मकर (Makar Rashi)
मकर राशीच्या व्यक्तींसाठी देखील शनी-मंगळ ग्रहाचा अद्भुत संयोग खूप खास असेल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. नवी संधी मिळेल, आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील.
वृश्चिक (Vruchik Rashi)
शनी-मंगळ ग्रहाचा अद्भुत संयोग वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. या काळात भाग्याची साथ मिळेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर सहज मात कराल.
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
