Shani Mangal Yog 2026: ऊर्जा आणि धैर्याचा ग्रह मंगळ मिथुन राशीत प्रवेश करत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या संक्रमणानंतर शनी आणि मंगळ एकमेकांच्या सापेक्ष मध्यवर्ती स्थितीत आले आहेत. या दोन ग्रहांची युती नकारात्मक परिणामांचे प्रतीक आहे. कारण ते स्वभावाने भिन्न आहेत. शनी कृती, शिस्त आणि संयमाचे प्रतिनिधित्व करतो, तर मंगळ धैर्य, ऊर्जा, क्रोध आणि निर्णायकतेचे. त्यामुळे या दोन ग्रहांचे मध्यवर्ती स्थितीत आगमन काही लोकांच्या जीवनात तणाव घेऊन येऊ शकतं. कामाच्या ठिकाणी अचानक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. तर मग जाणून घेऊया या कोणत्या राशी आहेत…

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांसाठी कामाच्या बाबतीत हा काळ आव्हानात्मक ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी वाढलेल्या जबाबदाऱ्यांमुळे खूप धावपळ होईल आणि कठोर परिश्रम करूनही अपेक्षित परिणाम मात्र मिळण्यास खूप विलंब होईल. नात्यांमध्ये क्षुल्लक बाबींवरून वाद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आपल्या शब्दांबाबत सावधगिरी बाळगा. आर्थिक गोष्टींवर काळजीपूर्वक विचार करणे देखील तुमच्यासाठी अनुकूल ठरेल. तसंच तुम्हाला कामानिमित्त वारंवार प्रवास करावा लागेल. या काळात मात्र विशेष खबरदारी घेणे तुमच्या फाद्याचे ठरेल.

कन्या राशी

हा काळ कन्या राशीच्या लोकांसाठी अडचणी घेऊन येऊ शकतो. नोकरदार व्यक्तींवरील वाढत्या कामाच्या भारामुळे मानसिक ताण येऊ शकते. काही समस्येमुळे घरात तणाव किंवा अशांतता निर्माण होऊ शकते. तसंच तुम्ही कला क्षेत्रात चांगले नाव कमवू शकता. नवीन घर खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी कदाचित आणखी वेळ लागू शकतो. हा काळ तुमच्या संयमाची परीक्षा घेणारा ठरेल. नवीन उपक्रम सुरू करण्याची योजना आखणाऱ्यांना अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबातील सदस्यांसोबतही संयमाने वागा.

मीन राशी

मीन राशीच्या लोकांना या काळात प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकावे लागेल. थोडासा निष्काळजीपणा देखील मोठं नुकसान करू शकतो. त्यामुळे वाहन चालवताना आणि प्रवास करताना विशेष सावधगिरी बाळगा. व्यावसायिकांनी भागीदारीत पूर्ण पारदर्शकता राखली पाहिजे, नाहीतर त्यांना आर्थिक नुकसान किंवा मतभेदांना सामोरे जावे लागू शकते. जर तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याचा किंवा मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर काही अडथळे येऊ शकतात. कोणताही मोठा निर्णय घाईघाईने घेणे टाळा. शिवाय आर्थिक लाभही होऊ शकतो.