Shani Margi 2022: शनिदेव ऑक्टोबरमध्ये मार्गी होणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवाची ही स्थिती काही राशींसाठी लाभदायक ठरू शकते. या धनत्रयोदशीला ५ राशीच्या लोकांना शनिदेवाचा मार्गी असल्याने फायदा होऊ शकतो. ज्योतिष शास्त्रात शनिदेवाला त्रास आणि समस्यांचे कारण मानले जाते. जाणून घेऊया शनिदेवाच्या मार्गामुळे धनत्रयोदशीला कोणत्या राशीच्या लोकांना धन वगैरे मिळू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिंह राशी

या कालावधीत या राशीच्या लोकांना पैसे मिळू शकतात. करिअरमध्ये चांगले परिणाम मिळण्याचीही शक्यता आहे. नोकरदारांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. उत्पन्नही वाढू शकते.

( ही ही वाचा: ऑक्टोबर महिन्यात ‘या’ ५ राशीच्या लोकांना होऊ शकतो बक्कळ धनलाभ, बनत आहे विशेष योगायोग; जाणून घ्या या भाग्यवान राशींबद्दल)

वृश्चिक राशी

या राशीच्या लोकांच्या आयुष्यात जमिनीशी संबंधित प्रकरणांमध्ये अधिक फायदा होऊ शकतो. प्रवासादरम्यान तुम्हाला लाभही मिळू शकतो. यासोबतच वाहन इत्यादींचा आनंदही मिळू शकतो. घरातील वातावरणही शांत राहील.

तूळ राशी

ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या लोकांच्या कुंडलीत शनिदेव चौथ्या भावात असतील. यामुळे धनत्रयोदशीला लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. यामुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊ शकता. धनत्रयोदशीला सोने खरेदी करणे खूप शुभ असू शकते.

( हे ही वाचा: ३० वर्षांनंतर शनिदेव झाले मकर राशीत वक्री; ‘या’ ३ राशींना धनसंपत्ती सोबत भाग्योदयाचे प्रबळ योग)

मीन राशी

या राशीच्या लोकांना करिअरमध्ये चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे . तुम्ही सहलीलाही जाऊ शकता. व्यवसायात नफा मिळू शकतो. नोकरीतही यश मिळू शकते. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या समस्या संपू शकतात. तणावही कमी होऊ शकतो. व्यवसायातील तोटा संपू शकतो. तसेच अनेक चांगले परिणाम मिळू शकतात.

मेष राशी

शनिदेवाच्या मार्गामुळे या राशीच्या लोकांना धनत्रयोदशीच्या दिवशी धनासोबत व्यापारातही लाभ मिळू शकतो. पॉवर टूल्स आणि वाहनांचा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ खूप शुभ आहे.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani margi 2022 the fate of these 5 zodiac signs will change on dhantrayodashi know which zodiac signs will be lucky gps
First published on: 20-09-2022 at 16:47 IST