यंदा १२ नोव्हेंबरला दिवाळीचा सण साजरा होणार आहे. दिवाळीचा सण आपल्या देशभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. अशातच यंदाच्या दिवाळीच्या आधी शनिदेव आपली चाल बदलणार आहेत. ४ नोव्हेंबर रोजी शनी कुंभ राशीत मार्गी होणार आहेत. तर आता शनिदेव कुंभ राशीत वक्री झाले आहेत. ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला विशेष स्थान आहे. शनिदेव केवळ अशुभ फळ देत नाहीत तर ते शुभ फळही देतात. जेव्हा शनिदेव शुभ असतात तेव्हा त्या माणसाचे आयुष्य राजासारखे होऊ शकते. शनिदेव मार्गी झाल्यामुळे काही राशींचे झोपलेले भाग्य जागे होऊ शकते. दिवाळीच्या आधी शनिदेव चाल बदलणार असल्यामुळे काही राशींचे भाग्य बदलण्याची शक्यता आहे. तर त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊया.
मेष रास –
शनी कुंभ राशीत मार्गी झाल्यामुळे मेष राशीच्या लोकांच्या मान-सन्मानात वाढ होऊ शकते. तसेच या काळात तुमचे आरोग्य चांगले राहू शकते. व्यवसायात नवीन संधीकडे लक्ष केंद्रीत करा, कारण व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा चांगला ठरू शकतो. या काळात एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहू शकते, अडकलेले पैसू मिळू शकतात.
वृषभ रास –
शनिदेवाच्या चालीत बदल करणार आहेत तो काळ तुमच्यासाठी चांगला ठरु शकतो. व्यवसायाशी संबंधित तुमचे आर्थिक संकट दूर होऊ शकतात. तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर कुठेतरी फिरायला जाऊ शकता. तसेच तुमचा मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे.
मिथुन रास –
या काळात तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात शिवाय अनेक कामात फायदा होऊ शकतो. सर्व व्यवहार शक्यतो निकाली काढा. नोकरीच्या ठिकाणी अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळू शकते. कलेची आवड वाढू शकते. व्यवसायासाठी हा काळ चांगला ठरु शकतो. तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, तसेच तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते.
धनु रास –
या काळात तुमचे नशीब चमकण्याची शक्यता आहे. शनिची चाल बदलल्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. कौटुंबिक जीवनात आनंदी राहू शकता. तसेच तुमच्या मानसन्मानात आणि पद-प्रतिष्ठेत वाढ होऊ शकते, या काळातील गुंतवणूक फायदेशीर ठरु शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
