Shani Margi 2024 : वैदिक पंचागानुसार, शनीने १५ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी कुंभ राशीत प्रवेश केला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शनी संथ गतीने फिरणारा ग्रह आहे, ज्यामुळे तो अडीच वर्षे एकाच राशीत भ्रमण करतो. कधी उलटी चाल (वक्री) तर कधी सरळ चाल (मार्गी) याप्रमाणे तो फिरत असतो. यात नव वर्षाच्या आधी शनी मार्गी होणार असल्याने काही राशींसाठी हे शुभ संकेत मानले जातात. ज्योतिषशास्त्रानुसार, वर्ष २०२४ संपताच शनी अनेक राशींसाठी प्रगतीचे दरवाजे उघडू शकतो. अशा परिस्थितीत शनी मार्गी असल्यामुळे कोणत्या राशींचे नशीब फळफळणार आहे हे जाणून घेऊया.

शनी मार्गी झाल्याने बदलणार ‘या’ राशींचे नशीब, धन- संपत्तीने समृद्ध होईल जीवन (Shani Margi 2024)

मेष (Mesh Rashi)

मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो, करिअरमध्ये प्रगती होईल. कामात मान-सन्मान मिळू शकतो. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडूनही तुम्हाला मदत मिळू शकेल. तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. तुम्ही नोकरी करत असाल तर तुमचा पगार वाढू शकतो. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नवीन नोकरी मिळू शकते.

shukra guru gochar 2024 in dhanu vrushabha astrology
७ नोव्हेंबरनंतर ‘या’ तीन राशींचे नशीब उजळणार, गुरु शुक्राच्या राशी बदलाने मिळणार भरपूर सुख अन् आर्थिक लाभ
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
Saturn-Venus gochar 2024
आजपासून शनी-शुक्र देणार नुसता पैसा ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य
5 December Vinayak Chaturthi astrological predictions for zodiac signs
५ डिसेंबर पंचांग: मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी मेषसह ‘या’ ३ राशींवर लक्ष्मीकृपा; आज गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडणार का? वाचा राशिभविष्य
shani nakshatra gochar 2024
पुढचे ११७ दिवस शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशीचे व्यक्ती होणार गडगंज श्रीमंत
Rahu-Ketu rashi parivartan 2024
‘या’ चार राशी कमावणार पैसाच पैसा; राहू-केतूचे राशी परिवर्तन देणार मानसन्मान आणि गडगंज पैसा
Indias most expensive film flopped after row over same sex kiss
दोन अभिनेत्रींमधील किसिंग सीनमुळे वाद, दिग्दर्शकाचं करिअर संपलं; तब्बल १० कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने कमावलेले फक्त…
Bigg Boss 18 Karan Veer Mehra Opens Up About His Ex Wives watch new promo
Bigg Boss 18: करणवीर मेहराने पूर्वाश्रमीच्या दोन पत्नीविषयी केलं भाष्य, भावुक होत म्हणाला, “दोघींच्या आयुष्यात मी…”

मिथुन (Mithun Rashi)

शनी मार्गी झाल्याने मिथुन राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळवता येऊ शकते. धैर्य आणि शक्ती वाढू शकते. शत्रूंवर विजय मिळवता येऊ शकतो. तसेच कामात मान-सन्मानही वाढू शकतो. कोणताही जुना आजार तुम्हाला त्रास देत असेल तर त्यापासूनही तुम्हाला आराम मिळू शकतो. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहू शकते. व्यवसायात यश मिळू शकते. या काळात तुम्हाला मोठी रक्कम मिळू शकते. एकूणच हा काळ तुमच्यासाठी चांगला राहील.

सिंह (Sigh Rashi)

सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ सुख-सुविधांनी समृद्ध असू शकतो. घरात आनंदी वातावरण राहू शकते. आर्थिक स्थिती चांगली राहू शकते. वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्याही कमी होऊ शकतात. कोर्ट केसेसमध्येही तुम्हाला फायदा होऊ शकतो.

हेही वाचा – Navpancham Rajyog 2024: २ डिसेंबरपासून चमकणार ‘या’राशींचे नशीब; नवपंचम राजयोगामुळे मिळणार गडगंज पैसा अन् मानसन्मान

धनु (Dhanu Rashi)

धनु राशीच्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे, त्यांच्यासाठी शनीची साडेसाती संपत आहे, यामुळे मानसिक ताण कमी होत त्यांना आराम मिळू शकतो. विशेषत: प्रवासाशी संबंधित काम करणाऱ्यांना फायदा होऊ शकतो. तुमच्या योजना यशस्वी होण्यास मदत होऊ शकते. आर्थिक लाभासह तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळू शकते.

कुंभ (Kumbha Rashi)

कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ राहील. कोणत्याही कामात तुम्हाला भाग्याची साथ मिळू शकते. प्रगतीच्या संधी मिळू शकतात. शनीच्या या बदलामुळे कुंडलीत एक विशेष योग तयार होईल, ज्यामुळे आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात लाभ होईल. करिअरमध्ये तुम्हाला अनेक नवीन संधी मिळू शकतात.

Story img Loader