Shani Margi 2026 Impact : शनिच्या चालीचा प्रभाव प्रत्येक राशीवर पडतो. सध्या शनि उलटी चाल (वक्री) चालत आहेत. शनिच्या चालीत होणारा बदल मेष ते मीन अशा सर्व १२ राशींवर परिणाम दाखवतो. शनि सध्या गुरुच्या (मीन) राशीत विराजमान आहेत. नुकतेच शनिने नक्षत्र परिवर्तन केले आहे. आता शनि वक्रीतून मार्गी होणार आहेत. यानंतर २०२७ मध्ये शनि मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करतील. शनिच्या मार्गी होण्याने काही राशींचे चांगले दिवस सुरू होणार आहेत. हिंदू पंचांगानुसार, सुमारे १३८ दिवस वक्री राहिल्यानंतर शनि आता मार्गी होणार आहेत. ११ डिसेंबरच्या सकाळपासून शनि सरळ चाल चालण्यास सुरुवात करतील.
ज्योतिषशास्त्रानुसार, शनि सध्या मीन राशीत आहेत आणि पुढील २४१ दिवसांसाठी मार्गी होणार आहेत. शनिची ही सरळ चाल ३ राशींसाठी खूप फायदेशीर ठरेल. या कालावधीत शनि आपली राशीसुद्धा बदलतील. शनि ९ ऑगस्ट २०२७ पर्यंत मार्गी चाल चालणार आहेत. जून २०२७ मध्ये शनि मेष राशीत प्रवेश करतील, ज्यामुळे साडेसातीचा क्रम बदलेल.
शनि मार्गी झाल्याने कोणत्या राशींना फायदा होणार?
शनिचे मार्गी होणे तुळ राशी, वृषभ राशी आणि मकर राशीसाठी अत्यंत शुभ मानले जात आहे. या काळात तुम्हाला सकारात्मक ऊर्जा जाणवेल. केलेल्या मेहनतीचे उत्तम फळ मिळेल. आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा दिसून येईल आणि अडकलेल्या कामांना वेग येईल. आयुष्यात सकारात्मक बदल घडतील आणि जवळच्या लोकांचे सहकार्य लाभेल. नोकरी-व्यवसायात परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. काही लोकांना कौतुक, नवीन पद किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. तसेच एखादी मोठी व्यावसायिक डीलही फायनल होऊ शकते.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
