Shani Margi: आजपासून ५६ दिवसांनंतर शनी मार्गी होणार आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मार्गी म्हणजे सरळ गतीने भ्रमण करणे. सध्या शनी वक्री म्हणजे उलट दिशेने भ्रमण करत आहेत. २७ जुलैपासून ही स्थिती सुरू झाली असून, यंदा ११ डिसेंबरपर्यंत शनी वक्रीच राहतील. शनीचे हे भ्रमण सध्या मीन राशीत सुरू आहे. वक्री शनी अनेक लोकांची कठीण परीक्षा घेत आहेत. मात्र, मार्गी झाल्यानंतर ते एकूण ६ राशींना त्यांच्या चांगल्या कर्मांचे फळ देतील.
पंडित नरेंद्र उपाध्याय यांच्या मते, शनी मार्गी होताच वृषभ, मिथुन, कन्या, तूळ, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांना मोठा दिलासा मिळेल. या राशींच्या लोकांच्या आयुष्यात कोणते बदल होऊ शकतात, ते जाणून घेऊया.
वृषभ राशीवर शनीचा कसा परिणाम होईल?
शनीच्या बदलत्या गतीचा सकारात्मक परिणाम वृषभ राशीच्या लोकांवर दिसून येईल. शुक्राच्या या राशीच्या लोकांना नोकरी आणि नातेसंबंधांमध्ये जाणवणारे अडथळे ११ डिसेंबरनंतर कमी होतील. करिअरमध्ये मनासारखे बदल दिसतील. एकामागून एक रखडलेली कामे पूर्ण होतील आणि चांगली प्रगती होईल. मेहनतीचे पूर्ण फळ शनी देतील.
मिथुन राशीवर शनीचा कसा परिणाम होईल?
आजपासून ५६ दिवसांनंतर मिथुन राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू लागेल. अनेक चांगल्या घटना घडतील आणि आपल्या चांगल्या कर्मांचे फळ मिळत असल्याची जाणीव होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरीत चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयुष्य योग्य दिशेने जाईल. कोणताही निर्णय घेताना सर्व बाजूंचा विचार करा. योग्य निर्णय भविष्यात मोठा फायदा करून देईल.
कन्या राशीवर शनीचा कसा परिणाम होईल?
बुधाच्या या राशीवर शनीचा सकारात्मक प्रभाव दिसेल. नोकरीत परिस्थिती तुमच्या बाजूने राहील. अनेक दिवसांपासून रखडलेली पदोन्नती आता मिळण्याची शक्यता आहे. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून मोठा लाभ होईल. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन करार मिळू शकतो, ज्याचा पुढे मोठा फायदा होईल. ११ डिसेंबरनंतर परिस्थिती अधिक अनुकूल होईल.
तूळ राशीवर शनीचा कसा परिणाम होईल?
शनी मार्गी झाल्यानंतर तूळ राशीच्या लोकांवरील नोकरीचा ताण बऱ्याच प्रमाणात कमी होईल. सर्जनशील कामांमध्ये मन रमेल आणि आयुष्यात नवीन उत्साह जाणवेल. व्यवसाय करणाऱ्यांना जुन्या ओळखीच्या लोकांकडून फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र, खर्च आणि बचत यांचा योग्य समतोल राखणे गरजेचे आहे. अनावश्यक खर्च टाळावा.
मकर राशीवर शनीचा कसा परिणाम होईल?
शनी मार्गी झाल्यानंतर मकर राशीच्या लोकांना लाभ मिळेल. अडकलेली कामे पुढे सरकतील. मनातील संभ्रम दूर होईल. नोकरीत प्रगतीची चिन्हे आहेत. पदोन्नती मिळू शकते. चांगली नोकरीची ऑफरही मिळण्याची शक्यता आहे. ११ डिसेंबरनंतर नशिबाची पूर्ण साथ मिळेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात चांगला समतोल राहील.
कुंभ राशीवर शनीचा कसा परिणाम होईल?
शनी वक्री अवस्थेतून मार्गी होताच कुंभ राशीच्या लोकांना काहीसा दिलासा मिळेल. मात्र, या राशीवर सध्या शनीची साडेसाती सुरू आहे. त्यामुळे अडचणी पूर्णपणे संपणार नाहीत, पण परिस्थिती आधीपेक्षा नक्कीच सुधारलेली दिसेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येईल. तसेच, कार्यालयातील तणावही काही प्रमाणात कमी होईल.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
