Shani Margi December 2026 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या गतीतील बदलांचा सर्व १२ राशींच्या जीवनावर मोठा परिणाम होतो. जेव्हा जेव्हा न्यायाची देवता आणि कर्मफळदाता शनी आपली गती बदलतो, तेव्हा त्याचा सर्व राशींच्या जीवनात मोठे बदल दिसून येतात. पंचांगानुसार, वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबर २०२६ मध्ये शनी आपली वक्री गती सोडून मार्गी होणार आहे. ११ डिसेंबर २०२६ रोजी शनी मार्गी होत असल्यामुळे, काही विशेष राशींच्या लोकांना मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. शनीच्या या मार्गी गतीमुळे कोणत्या ५ राशींना त्यांच्या करिअर आणि आर्थिक बाबतीत प्रचंड प्रगती मिळू शकते, ते जाणून घेऊया.
मेष
शनीची मार्गी गती मेष राशीच्या व्यक्तींसाठी करिअरच्या आघाडीवर अत्यंत फायदेशीर ठरू शकते. नोकरदार व्यक्तींना कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल, ज्यामुळे पदोन्नती आणि वेतनवाढीचे मार्ग मोकळे होतील. बऱ्याच काळापासून रखडलेल्या व्यावसायिक प्रकल्पांना पुन्हा गती मिळेल आणि आर्थिक परिस्थितीत मोठी सुधारणा होईल.
वृषभ
हा काळ वृषभ राशीच्या लोकांसाठी नशिबाची पूर्ण साथ घेऊन येईल. जे लोक बऱ्याच काळापासून नोकरी बदलण्याचा विचार करत होते किंवा नवीन नोकरीच्या शोधात होते, त्यांना यश मिळू शकते. व्यावसायिकांना अचानक मोठा नफा मिळू शकतो, ज्यामुळे त्यांचा बँक बॅलन्स वाढेल.
सिंह
शनी मार्गी होताच सिंह राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल आणि तुम्हाला उच्च पद मिळू शकते. या काळात वडिलोपार्जित मालमत्ता किंवा जुन्या गुंतवणुकीतून मोठा नफा मिळण्याचीही शक्यता आहे.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आर्थिक स्थितीत मोठा दिलासा आणि प्रगती अनुभवायला मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, ज्यामुळे संपत्ती जमा करणे सोपे होईल. व्यवसायातील पूर्वी केलेले प्रयत्न आता फळाला येतील आणि मोठा नफा मिळेल.
कुंभ
शनीची मार्गी गती कुंभ राशीत जन्मलेल्यांसाठी विशेषतः फलदायी ठरेल, कारण शनी हा कुंभ राशीचा स्वामी आहे. तुमच्या करिअरमधील सर्व अडथळे दूर होऊन काम सुरळीतपणे चालेल. या काळात अनपेक्षित आर्थिक लाभ आणि समृद्धी मिळण्याची दाट शक्यता आहे.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
