Shani Margi In Kumbh: ज्योतिषशास्त्रात शनि ग्रहाला खूप महत्त्वाचे स्थान प्राप्त आहे. शनि ग्रहाला न्याय आणि कर्माची देवता म्हणून ओळखले जाते, त्यामुळे असे म्हटले जाते की, जे लोक नेहमी न्यायाचे पालन करतात आणि चांगले कर्म करतात, अशा व्यक्तींवर शनिदेवाची सदैव कृपा असते. शनि शुभ स्थितीत असल्यास व्यक्तींचे भाग्य चमकते. परंतु, जर शनि अशुभ स्थितीत असेल तर व्यक्तीला अनेक अडचणींचा सामनादेखील करावा लागतो. दिवाळीनंतर शनि कुंभ राशीत मार्गी होणार असून हा शश राजयोगदेखील निर्माण होईल, ज्याचा शुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.
शनि कुंभ राशीत होणार मार्गी (Shani Margi In Kumbh)
मेष
मेष राशीच्या व्यक्तींसाठी कुंभ राशीत मार्गी होणारा शनि खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात धन-संपत्तीचे सुख मिळेल. तसेच उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील. समाजात मानसम्मान वाढेल. अडकलेले पैसे परत मिळतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल.
मिथुन
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठीदेखील कुंभ राशीत मार्गी होणारा शनि भाग्यकारक ठरेल. या काळात नोकरी, व्यवसायात हवे तसे यश प्राप्त करता येईल. नोकरदार व्यक्तींना प्रमोशन मिळेल. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण असेल, सर्वांसोबत चांगले संबंध निर्माण होतील. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील.
कर्क
कर्क राशीच्या व्यक्तींसाठीदेखील कुंभ राशीत मार्गी होणारा शनि खूप लाभकारी सिद्ध होईल. न्यायालयीन प्रकरणात यश मिळेल. नव्या कामाची सुरुवात होईल. कामातील अडथळे दूर होतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील.
सिंह
कुंभ राशीत मार्गी होणारा शनि सिंह राशीच्या व्यक्तींनाही अनुकूल फळ देईल. या काळात सिंह राशीच्या व्यक्तींना अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. आयुष्यात आनंदाचे क्षण येतील. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना संधी मिळेल. या काळात प्रमोशन होण्याची दाट शक्यता आहे. वैवाहिक जीवन सुखमय राहील. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. भरपूर पैसा कमवाल.
कन्या
कुंभ राशीत मार्गी होणारा शनि कन्या राशीच्या व्यक्तींसाठीही खूप सकारात्मक ठरेल. या काळात मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल. कुटुंबातील लोक प्रत्येक कामात सहकार्य करतील. धार्मिक कार्यात मन रमेल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होतील. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. घरी पाहुण्यांचे आगमन होईल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
© IE Online Media Services (P) Ltd