Shani Meen Gochar 2025: शनि हा सर्वात बलवान ग्रहांपैकी एक आहे. हा एक असा ग्रह आहे जो माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. ज्योतिषशास्त्रात, नवग्रहांमध्ये शनीला न्यायाधीशाचे स्थान आहे. शनी गोचर ही घटना अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सर्व ग्रहांमध्ये शनि हा सर्वात मंद गतीने जाणारा ग्रह आहे, एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी त्याला सुमारे अडीच वर्षे लागतात, त्यामुळे शनीला पुन्हा त्याच राशीत जाण्यासाठी ३० वर्षे लागतात. सध्या, शनी स्वतःच्या कुंभ राशीत मार्गक्रमण करत आहेत आणि शनी नोव्हेंबरमध्ये आपल्या मूळ सरळ चालीत पुन्हा मार्गी होतील. २०२५ मध्ये शनी कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करणार आहेत. २९ मार्च २०२५ रोजी शनीचे मीन राशीत संक्रमण होईल. कुंभ राशीतून शनीच्या प्रस्थानामुळे काही तीन राशींवर थेट परिणाम होईल. त्यांना आयुष्यात अपार यश, सुख समृध्दी लाभण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया या भाग्यशाली राशी कोणत्या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘या’ राशींचे उजळणार भाग्य?

मकर राशी

शनिदेवाच्या कृपेने मकर राशीच्या लोकांना चांगले दिवस पाहायला मिळू शकतात. तुमच्या व्यवसायात तसेच नोकरीत तुम्हाला चांगली प्रगती दिसून येऊ शकते. नोकरीत प्रमोशनची संधी मिळू शकते. तुमच्यासाठी उत्पन्नाचे अनेक नवीन मार्ग खुले होऊ शकतात. या काळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळू शकते. तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. व्यवसायातून तुम्हाला चांगला लाभ मिळू शकतात. परदेशात जाण्याची देखील संधी मिळू शकते. वडिलोत्पार्जित संपत्तीतून तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता दाट आहे. समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसून येऊ शकतो.

(हे ही वाचा : ५०० वर्षांनी नागपंचमीला ५ शुभयोग; ‘या’ राशींना महादेव देतील अपार धन? नागदेवताच्या कृपेने घरात येऊ शकतो चांगला पैसा )

कर्क राशी

कर्क राशीच्या लोकांना शनिदेवाच्या कृपेने मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात सकारात्मक परिणाम मिळू शकतात. नोकरदार लोकांना या काळात वेतनवाढ आणि पदोन्नती मिळू शकते. व्यवसायात प्रचंड यश आणि नफा देखील मिळू शकतो. या काळात तुम्ही वाहन किंवा घर खरेदी करू शकता. तसंच या काळात तुमच्याकडे भरपूर पैसा येऊ शकतो. तुमची आर्थिक स्थिती यावेळी मजबूत होऊ शकते. यासोबत रखडलेली कामही यावेळी पूर्ण होऊ शकतात.

वृश्चिक राशी

शनिदेवाच्या कृपेने वृश्चिक राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होऊ शकतात. व्यापारी वर्गातील लोकांना चांगला नफा मिळू शकतो. मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होऊ शकतो. या काळात धनलाभ होऊ शकतो आणि प्रगतीचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. मुलांशी संबंधित कोणतीही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते, ज्यामुळे समाधान आणि आनंद मिळू शकतो. जे लोक खूप दिवसांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत होते शनिदेव त्यांची मनोकामना पूर्ण करु शकतात. या लोकांच्या भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होऊ शकते. घर आणि वाहन खरेदीचे योग जुळून येऊ शकतात. 

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani meen gochar saturn leaves aquarius in 2025 these zodiac sign can get huge money pdb
Show comments