Shani-Mercury kendra drishti: ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रह एका निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन किंवा नक्षत्र परिवर्तन करतो. ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव १२ राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. तसेच या राशी परिवर्तनादरम्यान अनेकदा दोन ग्रह एकाच राशीत युती निर्माण करतात किंवा एकमेकांसमोर येतात. येत्या २७ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजून ५६ मिनिटांनी बुध आणि शनी एकमेकांपासून ९० अंशामध्ये स्थित असतील, ज्यामुळे समकोणीय किंवा केंद्र दृष्टि योग निर्माण होईल. ज्याचा शुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.

शनी-बुध करणार मालामाल

मिथुन

Conjunction Of Shani And Budh
फेब्रुवारीपासून शनी-बुध देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Surya transit in kumbh
पुढील २८ दिवसानंतर सूर्य करणार मालामाल; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार पद, प्रतिष्ठा अन् पैसाच पैसा
Shani Pluto Ardhakedra Yog
२२ जानेवारीला शनि-यम निर्माण करणार शक्तीशाली योग! ‘या’ ३ राशींचे नशीब पलटणार, अचानक होईल धनलाभ
Mangal rashi parivrtan 2024
येणारे ७० दिवस मंगळ करणार कृपा; ‘या’ तीन राशींची होणार चांदी
shani budh yuti 2025 saturn and mercury conjunction today horoscope
Shani-Budh Yuti 2025 : १२ फेब्रुवारीपासून ‘या’ राशींच्या लोकांचे झटक्यात पालटणार नशीब; शनी-बुध संयोगाने मिळणार बक्कळ पैसा अन् जबरदस्त यश
In 17 days, these three zodiac signs will live a life of luxury and comfort
१७ दिवसांनी ‘या’ तीन राशी जगतील ऐशो-आरामाचे आयुष्य! शुक्र करणार मीन राशीत प्रवेश, नवीन नोकरीमुळे प्रगतीचा योग
४ फेब्रुवारीपासून ‘या’ तीन राशींचे नशीब चमकणार! गुरु ग्रह होणार मार्गी, मिळेल पद-प्रतिष्ठा

शनी-बुधाची केंद्र दृष्टी युती मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी सकारात्मक ठरेल. या काळात भौतिक सुखाची प्राप्ती होईल. नवीन कार्य सुरू करण्यासाठी अनुकूल काळ आहे. वैवाहिक जीवन सुखमय असेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. तुमच्या साहस आणि पराक्रमात वाढ होईल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी नोकरी मिळेल. परदेशात जाण्याचे योग येतील.

मकर

शनी-बुधाची केंद्र दृष्टी मकर राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमचा भाग्योदय होईल. मेहनत केलेल्या कामात हवे तसे यश मिळविता येईल. आर्थिक परिस्थिती उत्तम होईल. करिअर आणि व्यवसायात मानासारखे यश प्रस्थापित कराल. अडकलेले पैसे परत मिळतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल.

हेही वाचा: ४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान

मीन

मीन राशीच्या व्यक्तींसाठी शनी-बुधाची केंद्र दृष्टी अत्यंत फायदेशीर ठरेल. या काळात समस्यांपासून सुटका होईल. ताणतणाव दूर होण्यास मदत होईल, मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. मीन राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. भौतिक सुखाची प्राप्ती होईल. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आरोग्य चांगले राहील. कुटुंबीयांचे संबंध चांगले होतील. वैवाहिक जीवन सुखमय राहील.

(टीपः वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader