Shani Nakshatra Pada Gochar 2026: ज्योतिषशास्त्रात शनीला खूप महत्वपूर्ण ग्रह मानले जाते. शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता देखील म्हटलं जातं. शनी नेहमीच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीना शुभ फळ प्रदान करतो. तर इतरांना विणाकारण त्रास देणाऱ्या आणि वाईट कर्म करणाऱ्यांवर शनीचा नकारात्मक प्रभाव पडतो. शनी सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे; त्यामुळे त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षाचा कालवधी लागतो. तसेच वेळोवेळी तो नक्षत्र परिवर्तन आणि नक्षत्र पद परिवर्तनही करतो.

पंचांगानुसार, शनी १७ एप्रिल २०२६ रोजी उत्तराभाद्रपद नक्षत्राच्या चतुर्थ पदामध्ये दुपारी ०४ वाजून ०५ मिनिटांनी प्रवेश करणार आहे. शनीचे हे नक्षत्र पद परिवर्तन १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींसाठी नुकसानदायी ठरू शकते.

शनीच्या नक्षत्र पद गोचराने ‘या’ राशींना धनहानी होणार

कुंभ (Kumbha Rashi)

शनीचे नक्षत्र पद गोचर कुंभ राशीसाठी खूपच लाभदायी ठरेल. या काळात कोर्ट-कचेरीच्या कामांत पराभव होऊ शकतो आणि काही गुप्त शत्रू त्रास देऊ शकतात. तसेच पोट आणि हृदयाशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे. वाहन सावधगिरीने चालवा, कारण अपघाताची शक्यता आहे. त्याशिवाय तुमच्यावर शनीची साडेसाती सुरू आहे, त्यामुळे जपून राहणे गरजेचे आहे.

कन्या (Kanya Rashi)

कन्या राशीच्या विवाहित लोकांच्या वैवाहिक जीवनात थोडा तणाव येऊ शकतो. या काळात भागीदारीत नवीन काम सुरू करण्याचे टाळा. तसेच कुटुंबातील लोकांसोबत काही गोष्टींवर मतभेद होऊ शकतात. या काळात हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतो किंवा ज्यांना आधीपासून हृदयाचा त्रास आहे त्यांनी जपून राहावे.

वृषभ (Vrushabh Rashi)

वृषभ राशीच्या लोकांसाठी हे गोचर नुकसानदायक ठरू शकते. कारण ही युती तुमच्या गोचर कुंडलीच्या पहिल्या भावात होईल. या काळात तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. तुमच्या मान-सन्मानात घट होण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या कामासाठी प्रवास करण्याचा विचार असेल तर तो आत्तासाठी टाळा, कारण प्रवासात अपघात होऊ शकतो. तसेच या काळात कोणाला पैसे उधार देणे टाळा.

धनु (Dhanu Rashi)

धनु राशीच्या लोकांना शनीचे नक्षत्र गोचर घातक ठरू शकते. नवीन गुंतवणूक, कर्ज घेणे किंवा मोठ्या खर्चाचे नियोजन करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते. तसेच आरोग्याकडेही दुर्लक्ष करू नये, कारण मानसिक तणावाचा परिणाम शारीरिक आरोग्यावर होऊ शकतो. नियमित दिनचर्या पाळणे, पुरेशी झोप घेणे आणि सकारात्मक विचार ठेवणे या गोष्टींमुळे परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे सोपे जाऊ शकते.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)