Shani Nakshatra Gochar 2026: ज्योतिषशास्त्रात शनीला खूप महत्वपूर्ण ग्रह मानले जाते. शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता देखील म्हटलं जातं. शनी नेहमीच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीना शुभ फळ प्रदान करतो. तर इतरांना विणाकारण त्रास देणाऱ्या आणि वाईट कर्म करणाऱ्यांवर शनीचा नकारात्मक प्रभाव पडतो. याव्यतिरिक्त शनीचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तनही खूप खास मानले जाते. शनी सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे; त्यामुळे त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षाचा कालवधी लागतो. तसेच वेळोवेळी तो नक्षत्र परिवर्तनही करतो. जेव्हा शनिदेव आपली राशी किंवा नक्षत्र बदलतात, तेव्हा त्याचा परिणाम सर्व १२ राशींवर वेगवेगळ्या प्रकारे होतो.
पंचांगानुसार, ९ ऑक्टोबर २०२६ रोजी, शनीदेव उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करतील आणि ८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत याच नक्षत्रात त्यांचे भ्रमण सुरू राहील. शनीचे हे गोचर अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. शनी हा उत्तरा भाद्रपदा नक्षत्राचा स्वामी मानला जातो. परिणामी, या पाच राशींखाली जन्मलेल्या लोकांना शुभ फळे मिळतील.
नक्षत्र परिवर्तन म्हणजे काय?
ज्योतिषशास्त्रातील २७ नक्षत्रांमध्ये १२ राशी विभागल्या गेल्या आहेत. त्यामुळे ज्याप्रमाणे ग्रह राशी परिवर्तन करतात त्याप्रमाणे नक्षत्र परिवर्तनही करतात. राशी परिवर्तनाइतकेच नक्षत्र परिवर्तनही खूप प्रभावी आणि खास मानले जाते. ज्योतिषशास्त्रात पुष्य, अनुराधा आणि उत्तराभाद्रपद या नक्षत्रांचा स्वामी शनी आहे.
शनीदेव ‘या’ राशींचे नशीब चमकवणार
कन्या (Kanya Rashi)
शनीचा उत्तराभाद्रपद नक्षत्रातील प्रवेश कन्या राशीच्या व्यक्तींना खूप लाभदायी ठरेल. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. आरोग्य चांगले राहील. आयुष्यात मानसन्मान आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. व्यापारी वर्गाला प्रत्येक कामात यश मिळेल.
यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात हवे तसे यश मिळेल.
मकर (Makar Rashi)
कुंभ राशीच्या व्यक्तींना शनीचा उत्तरभाद्रपद नक्षत्रातील प्रवेश खूप सकारात्मक फळ देणारा ठरणार आहे. या काळात भाग्याची पूरेपूर साथ मिळेल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील, करिअरमध्ये हवे तसे यश मिळविता येईल. व्यवसायात हवी तशी प्रगती पाहायला मिळेल. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येतील. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. आर्थिक बाजू भक्कम होईल. या काळात तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल.
वृषभ (Vrushabh Rashi)
मीन राशीच्या व्यक्तींना शनीचा उत्तराभाद्रपद नक्षत्रातील प्रवेश अत्यंत लाभदायी ठरेल. या काळात नव्या कामाची सुरुवात होईल. कामातील अडथळे दूर होतील. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. तुमचे प्रेमसंबंध चांगले होतील, नात्यात गोडवा येईल.
मिथुन (Mithun Rashi)
शनीच्या नक्षत्र गोचरामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये स्थिरता आणि प्रगतीच्या संधी मिळू शकतात. रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता असून मेहनतीचे चांगले परिणाम मिळू शकतात. आर्थिक बाबतीत नियोजन आणि बचतीला फायदा होईल. नोकरीत जबाबदारी वाढू शकते, तर व्यवसायात नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ केलेल्या प्रयत्नांना यश मिळण्याचे संकेत आहेत.
तूळ (Tula Rashi)
तूळ राशीच्या व्यक्तींना शनीच्या नक्षत्र गोचरामुळे आर्थिक स्थैर्य आणि करिअरमध्ये सकारात्मक बदल अनुभवायला मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होण्याची शक्यता असून कामाच्या ठिकाणी महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. गुंतवणूक किंवा आर्थिक नियोजन करताना दीर्घकालीन विचार केल्यास फायदा होऊ शकतो. तसेच वैयक्तिक आयुष्यात स्थैर्य आणि जबाबदारीची भावना वाढण्याचे संकेत आहेत.
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
