Shani Nakshatra Gochar 2026: ज्योतिषशास्त्रामध्ये शनीला कर्म फळदाता आणि न्यायाचा कारक ग्रह म्हणून ओळखले जाते. शनी नवग्रहातील ग्रहांमध्ये सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करण्यासाठी शनीला जवळपास अडीच वर्षाचा कालावधी लागतो. पंचांगानुसार, शनी २० ऑगस्ट २०२६ रोजी संध्याकाळी ०७ वाजून ४५ मिनिटांनी रेवती नक्षत्राच्या द्वितीय पदातून पहिल्या पदामध्ये प्रवेश करणार आहे. शनीचे हे नक्षत्र पद गोचर काही राशींच्या लोकांचे भाग्य उजळेल.

शनीदेव ‘या’ राशींना करणार मालामाल

वृषभ (Vrushabh Rashi)

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी देखील शनीचे राशी परिवर्तन खूप खास असेल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. नवी संधी मिळेल, आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल.

मिथुन (Mithun Rashi)

शनीचे राशी परिवर्तन मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. धार्मिक कार्यात मन रमेल. या काळात भाग्याची साथ मिळेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर सहज मात कराल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल.

तूळ (Tula Rashi)

तूळ राशीच्या व्यक्तींना शनीचे राशी परिवर्तन लाभदायी ठरेल. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. समाजात मान-सन्मान वाढेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. जोडीदाराला वेळ द्याल. मानसिक तणावातून मुक्त रहाल. आयुष्यात आनंदी आनंद असेल.

धनु (Dhanu Rashi)

शनीच्या गोचरामुळे धनु राशीच्या व्यक्तींना आर्थिक क्षेत्रात मोठी प्रगती दिसून येईल. रखडलेली कामे मार्गी लागतील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारवाढीची संधी मिळू शकते. व्यवसायात नवीन करार आणि लाभदायक व्यवहार होतील. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील, तर विवाहितांच्या आयुष्यात आनंद आणि समंजसपणा वाढेल. समाजात मान-सन्मान वाढून प्रसिद्धी मिळण्याची शक्यता आहे.

मकर (Makar Rashi)

शनीच्या गोचरामुळे मकर राशीच्या व्यक्तींना या गोचराचा अत्यंत शुभ लाभ मिळू शकतो. करिअरमध्ये मोठ्या संधी मिळतील आणि वरिष्ठांकडून कौतुक होईल. व्यवसायात नफा वाढेल तसेच नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. प्रेमजीवनात सकारात्मक बदल घडतील आणि जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या कामामुळे लोकांमध्ये ओळख निर्माण होईल आणि लोकप्रियता मिळू शकते.

कुंभ (Kumbha Rashi)

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ भाग्योदयाचा ठरू शकतो. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि अचानक धनलाभाचे योग तयार होतील. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा मोठे निर्णय घेण्यासाठी हा काळ अनुकूल राहील. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि जवळीक वाढेल. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. समाजात तुमच्या कार्याचे कौतुक होईल आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)