Shani Nakshatra Gochar : ज्योतिषशास्त्रानुसार, शनिला कर्मदाता म्हणतात. तो व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. कर्मदाता शनि एका ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन करतो. तो जवळपास अडीच वर्षानंतर राशी परिवर्तन करतो. शनिच्या राशी परिवर्तनामुळे राशीचक्रातील इतर राशींवर परिणाम दिसून येतो. एवढंच नाही तर शनि राशीशिवाय वेळोवेळी नक्षत्र परिवर्तन करतो. शनि यावेळी पूर्वाभाद्रपद नक्षत्रामध्ये विराजमान आहे. ३ ऑक्टोबरला शनि राहुच्या नक्षत्रामध्ये शतभिषा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. शनि त्याच्या मित्राच्या नक्षत्रामध्ये प्रवेश करत असल्यामुळे काही राशीच्या लोकांना लाभ मिळू शकतो.
पंचागनुसार, शनिदेव ३ ऑक्टोबर दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी शतभिषा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे आणि २७ डिसेंबर पर्यंत याच नक्षत्रामध्ये विराजमान राहणार. ज्योतिषशास्त्रानुसार, २७ नक्षत्रामध्ये शतभिषा नक्षत्र हे २४ वे नक्षत्र आहे. या नक्षत्राचा स्वामी राहु आणि कुंभ आहे. तसेच शनि यावेळी त्याच्या त्रिकोण राशी कुंभमध्ये विराजमान आहे ज्यामुळे इतर राशींना भरपूर लाभ मिळू शकतो.
वृषभ राशी (Vrishabha Zodiac)
शनि शतभिषा नक्षत्रामध्ये प्रवेश केल्यानंतर या राशीच्या दहाव्या स्थानावर राहणार आहे. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते आणि करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. करिअरच्या क्षेत्रात या लोकांना भरपूर यश मिळेल पण त्याचबरोबर धनलाभ होऊ शकतो. या लोकांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होईल. धनलाभाचे योग दिसून येईल. तुम्ही तुमचे ध्येय प्राप्त करण्यात यशस्वी व्हाल. जर तुमचा व्यवसाय विदेशात असेल तर विदेशात धनलाभाचे योग जुळून येतील. या लोकांचे आरोग्य उत्तम राहीन.
धनु राशी (Dhanu Rashi)
या राशीमध्ये शनि तिसऱ्या स्थानावर आहे. शनि शतभिषा नक्षत्रामध्ये येत असल्यामुळे या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश आणि धनलाभ मिळू शकतो. करिअरच्या क्षेत्रात खूप लाभ मिळू शकतो. या लोकांच्या जीवनात भरपूर आनंद येईल. नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. तुमच्या वाटेला आलेल्या अडचणी दूर होतील. समाजात मान सन्मान वाढेल. व्यवसायाच्या क्षेत्रात खूप लाभ मिळू शकतो. सरकारी कामात लाभ मिळू शकतो. वरिष्ठांबरोबर चांगले संबंध निर्माण होऊ शकतात. लव लाइफ उत्तम राहीन. कुटुंबाबरोबर चांगले संबंध निर्माण होईल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)