scorecardresearch

Premium

शनीदेव नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करणार नक्षत्र बदल; २४ दिवसांनी ‘या’ राशींचे अच्छे दिन होणार सुरु, लाभेल धन

Shani Gochar: आश्विन महिन्याच्या पहिल्याच दिवशी शनिदेव आपल्या स्वामित्वाच्या शतभिषा नक्षत्रातून बाहेर पडून धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश घेणार आहेत.धनिष्ठा नक्षत्रात जन्मलेली व्यक्ती मंगळ आणि शनीच्या प्रभावाखाली राहते.

Shani Nakshatra Gochar On First Day Of Navratri 24 days Later These Rashi Bhavishya Will Brighten With More Money Astrology
शनी नक्षत्र बदलामुळे काही राशींना करिअरमध्ये प्रगतीसह धनलाभाचे सुद्धा योग आहेत. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Shani Nakshtra Gochar: कलियुगातील न्यायाधिकारी शनी महाराज हे नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला कुंभ राशीतच मार्गी होणार आहेत पण तत्पूर्वी एका अत्यंत शुभ प्रसंगी शनीचा नक्षत्र बदल सुद्धा होणार आहे. येत्या आश्विन महिन्याच्या पहिल्याच दिवशी शनिदेव आपल्या स्वामित्वाच्या शतभिषा नक्षत्रातून बाहेर पडून धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश घेणार आहेत.धनिष्ठा नक्षत्रात जन्मलेली व्यक्ती मंगळ आणि शनीच्या प्रभावाखाली राहते.

पंचांगानुसार १५ ऑक्टोबरला म्हणजेच रविवारी अगदी पहाटे ४ वाजून ४९ मिनिटांनी शनीचा नक्षत्र बदल होणार आहे. यामुळे दसरा व दिवाळी दोन्ही सण काही राशींच्या नशिबात अच्छे दिन घेऊन येणार आहे. या राशींना करिअरमध्ये प्रगतीसह धनलाभाचे सुद्धा योग आहेत. तुमची रास यामध्ये समाविष्ट आहे का, तुम्हीही नशीबवान आहात का याविषयी जाणून घेऊया…

Shani Nakshatra Parivartan
सूर्यग्रहणानंतर शनिदेव नक्षत्र परिवर्तन करताच ‘या’ राशींना भरभरून मिळणार पैसा? माता लक्ष्मीच्या कृपेने येऊ शकतात ‘अच्छे दिन’
gold investment
Money Mantra: सणासुदीच्या काळात सोने विकत घेताय? मग हे नक्की वाचा
Daily Horoscope 30 September 2023
Daily Horoscope: महिन्याच्या शेवटच्या दिवशी ‘या’ राशीच्या व्यापाऱ्यांना होणार लाभ, पाहा तुमचे भविष्य
Shukra Gochar 2023
पुढील महिन्याच्या सुरुवातीला ‘या’ राशींचे अच्छे दिन सुरु? शुक्र कन्या राशीत प्रवेश करताच मिळू शकतो गडगंज पैसा

मेष रास (Aries Rashi Bhavishya)

शनी अकराव्या अर्थात लाभ स्थानात येत आहे. हा शनी वर्षभर आपल्याला उत्तम साथ देईल. उद्योगधंद्यात राजकारणात पुढे येण्याची संधी प्राप्त करून देईल. नवीन परिचय, नवीन गाठी भेटीतून होणारा आनंदाचा स्पर्श मनाला उभारी देईल. जागोजागी मदतीचे हात पुढे येतील.

मिथुन रास (Gemini Rashi Bhavishya)

मिथुन राशीच्या नवम स्थानात कुंभेचा शनी आपल्या भाग्य स्थानात आहे. हा शनीमुळे उद्योगधंद्यात, नोकरीत आपल्या विचारांचे व सल्ल्याचे स्वागत होईल. कामानिमित्त दूरचे प्रवास घडतील. राजकारणात सामाजिक कार्यात उत्तम यश लाभेल. लोकाभिमुख होण्याची उत्तम संधी लाभेल. जमीन शेती खरेदी विक्रीत विशेष लाभ होईल. आरोग्य उत्तम राहील

वृश्चिक रास (Scorpio Rashi Bhavishya)

कुंभेचा शनी वृश्चिक राशीला चतुर्थ स्थानात येतो. शनीशी होणारा शुभयोग कौटुंबिक कलह दूर करील. स्थावर इस्टेट मालमत्ता शेती वाडीच्या खरेदीविक्रीतून फायदा होईल. कोर्टकचेरी निकालात यश लाभेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे.

हे ही वाचा<< १५ दिवसात दोनवेळा ग्रहण, ‘या’ राशींचे दिवस बदलणार; नवरात्रीत लक्ष्मी देईल सूर्याचे तेज व सुखाचे चांदणे

कुंभ रास (Aquarius Rashi Bhavishya)

शनी खूप लाभदायक ठरेल. बुद्धी प्रयत्न आणि श्रम यातून या राशीला उत्तम यश प्राप्ती होईल. या लोकांना शनीचा संयम शोधकवृत्ती नी उ्दयोगबुद्धी नैसर्गिक प्राप्त होईल. त्यामुळे आर्थक बाजू उत्तम राहील. त्यात धनस्थानात स्वराशीचा गुरु बोलण्यातून वागण्यातून आपली विद्वत्ता प्रदर्शित करेल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीनुसार आधारित आहे)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shani nakshatra gochar on first day of navratri 24 days later these rashi bhavishya will brighten with more money astrology svs

First published on: 21-09-2023 at 16:49 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×