Shani Pada Nakshatra Gochar 2026: न्याय आणि कर्माचा ग्रह शनि २० जानेवारी २०२६ रोजी स्वत:च्या उत्तराभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल आणि त्यानंतर रविवार २२ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ९ मिनिटांनी उत्तरभाद्रपद नक्षत्राच्या दुसऱ्या पदात प्रवेश करेल. शनीच्या या नक्षत्र गोचराचा चार राशींच्या लोकांवर खूप शुभ परिणाम होऊ शकतो. तर मग जाणून घेऊया या कोणत्या चार राशी आहेत आणि त्यांना कोणते फायदे मिळू शकतात.
वृषभ राशी
उत्तरभाद्रपद नक्षत्राच्या दुसऱ्या स्थानात शनीचा प्रवेश वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकतो. त्यांना आर्थिक टंचाई जाणवणार नाही आणि वेळ अनुकूल राहील. कामातील अडथळे दूर होतील आणि उत्पन्नात सातत्याने वाढ होईल. कठोर परिश्रमाचे फळ मिळेल आणि संयमाचे सकारात्मक परिणाम मिळतील.
कुंभ राशी
उत्तरभाद्रपद नक्षत्राच्या दुसऱ्या स्थानात शनीचा प्रवेश कुंभ राशीसाठी शुभ ठरू शकतो. कौटुंबिक सुख आणि शांती वाढेल तसंच जुन्या योजनांवर काम सुरू होईल. एखादा महत्त्वाचा व्यवसाय करार होऊ शकतो. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा काळ उत्तम असेल आणि तुम्ही तुमचा आत्मविश्वास कायम ठेवाल. तुम्ही पूर्वीइतकेच पैसे कमवाल, मात्र तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवू शकाल.
मकर राशी
उत्तरभाद्रपद नक्षत्राच्या दुसऱ्या स्थानात शनीचा प्रवेश मकर राशीसाठी शुभ परिणाम देईल. कामाच्या ठिकाणी तुम्ही परिस्थिती नियंत्रित करू शकाल. तुम्हाला करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळू शकतात. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात आणि तुम्हाला मालमत्तेशी संबंधित किंवा वाहनांशी संबंधित फायदे मिळू शकतात. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल.
मीन राशी
उत्तरभाद्रपद नक्षत्राच्या दुसऱ्या स्थानात शनीचा प्रवेश मीन राशीच्या लोकांसाठी नफा कमवण्याचे अनेक मार्ग उघड होतील. त्यामुळे घरात आनंद आणि समृद्धी येईल. कठोर परिश्रमाचे कौतुक होईल आणि त्यांना समाजात आदर मिळेल. प्रलंबित काम लवकर पूर्ण होतील. तुमच्या जीवनशैलीत सकारात्मकता प्रबळ होईल. तसंच गुंतवणुकीमुळे सकारात्मक परिणाम मिळतील.
