Shani Nakshatra Parivartan 2026 Impact on Zodiac Signs: ज्योतिषशास्त्रात शनी देवाचा गोचर अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. प्रत्येक हालचालीचा मानवी जीवनावर सूक्ष्म परिणाम होतो, असं मानलं जातं. अशातच १७ मे २०२६ रोजी शनी देव रेवती नक्षत्रात प्रवेश करणार आहे. हा बदल काही राशींच्या लोकांसाठी विशेष सकारात्मक ठरू शकतो, अशी ज्योतिषीय शक्यता व्यक्त केली जाते. विशेष म्हणजे शनी देव बुधाच्या नक्षत्रात प्रवेश करीत असल्याने, काही राशींच्या लोकांच्या जीवनात अचानक बदल घडू शकतात. विशेषतः करिअर, आर्थिक स्थिती आणि सामाजिक प्रतिष्ठा यांमध्ये. मात्र, हे सर्व ज्योतिषशास्त्रीय अंदाज असून, प्रत्यक्ष परिणाम व्यक्तिनिहाय बदलू शकतात. चला जाणून घेऊया त्या ४ राशींच्या लोकांबद्दल, ज्यांच्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो.

मेष

हा काळ मेष राशीच्या लोकांसाठी एका नव्या सुरुवातीसारखा ठरू शकतो, अशी शक्यता आहे. आतापर्यंत ज्या गोष्टींसाठी प्रयत्न करीत होतात, त्यात हळूहळू यश मिळू लागेल, असं चित्र दिसू शकतं. नवीन नोकरीची संधी मिळू शकते किंवा सध्याच्या नोकरीत चांगली प्रगती दिसू शकते. काहींची अपेक्षित ठिकाणी बदली होण्याचीही शक्यता आहे. आर्थिक बाबतीतही थोडा दिलासा मिळू शकतो. उत्पन्न वाढण्याची चिन्हंही दिसू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक मिळू शकतात, नफ्यात वाढ होऊ शकते. सामाजिक स्तरावरही तुमचा मान-सन्मान वाढू शकतो, लोक तुमच्या कामाची दखल घेऊ शकतात. मात्र, घाई-गडबड टाळणं गरजेचं ठरेल.

वृषभ

हा काळ वृषभ राशीच्या लोकांना काहीसा दिलासा देणारा ठरू शकतो. बराच काळ अडकलेली कामं पूर्ण होण्याची चिन्हं दिसू शकतात.
जुने प्रकल्प पूर्ण होतील आणि त्यामुळे मनावरचं ओझं कमी होऊ शकतं. आर्थिकदृष्ट्या काही सकारात्मक घडामोडी घडू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. काहींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. घरात आनंदाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. कुटुंबीयांमध्ये सुसंवाद वाढू शकतो आणि मानसिक समाधान मिळू शकतं.

कन्या

हा काळ कन्या राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये मोठी झेप घेण्याचा ठरू शकतो, अशी शक्यता आहे. नवीन नोकरीच्या ऑफर्स मिळू शकतात किंवा सध्याच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढू शकतो. वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकतं, ज्यामुळे आत्मविश्वास दुपटीनं वाढेल. व्यावसायिकांसाठीही हा काळ फायदेशीर ठरू शकतो. नवीन करार, नवीन संधी आणि नफ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. समाजात तुमची प्रतिमा अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक

हा काळ वृश्चिक राशीच्या लोकांसाठी बदल घडवणारा ठरू शकतो, अशी शक्यता आहे. आतापर्यंत अडकलेली कामं पूर्ण होऊ शकतात, त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. एखाद्या मोठ्या प्रकल्पाचं काम हाती येऊ शकतं, जे तुमच्या करिअरला वेग देईल. परदेशात नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित संधी मिळण्याची शक्यता आहे. पैतृक संपत्ती किंवा जुन्या मालमत्तेतून लाभ मिळू शकतो. तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळू शकते आणि समाजात मान-सन्मान वाढण्याची चिन्हं दिसू शकतात.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)