Shani Uttara Bhadrapada Nakshatra Pravesh : वैदिक ज्योतिषात शनिदेवाला कर्मफळदाता आणि न्यायाची देवता मानले गेले आहे. शनिग्रह जेव्हा जेव्हा आपली चाल किंवा नक्षत्र बदलतो, तेव्हा त्याचा मानवी जीवनावर खूप खोल प्रभाव पडतो. ज्योतिषशास्त्रानुसार, २०२६ मध्ये ९ ऑक्टोबर रोजी शनिदेवाचे मोठे नक्षत्र परिवर्तन होणार आहे. या दिवशी ते पूर्वा भाद्रपद नक्षत्रातून उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करतील. उत्तरा भाद्रपद नक्षत्राचे स्वामी स्वतः शनिदेवच आहेत. जेव्हा कोणताही ग्रह स्वतःच्याच नक्षत्रात प्रवेश करतो, तेव्हा त्याची शुभता आणि प्रभाव अनेक पटींनी वाढतो. शनीचे हे नक्षत्र गोचर केवळ अध्यात्मिक दृष्टीनेच महत्त्वाचे नाही, तर व्यापार, करिअर, आरोग्य आणि कौटुंबिक जीवनावरही त्याचा व्यापक प्रभाव पडेल.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी शनीचे हे नक्षत्र गोचर अत्यंत शुभ परिणाम घेऊन येईल. तुमची अडकलेली कामे आता वेग घेतील. नोकरदार व्यक्तींना पदोन्नती आणि पगारवाढीची शक्यता आहे. जर तुम्ही बऱ्याच काळापासून नवीन व्यवसायाची योजना आखत असाल, तर ही वेळ गुंतवणुकीसाठी अनुकूल ठरेल.
मकर
मकर राशीचे स्वामी शनिदेव आहेत. उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश केल्यामुळे मकर राशीच्या लोकांना मानसिक त्रासापासून आणि तणावापासून दिलासा मिळेल. जुन्या आजारांतून मुक्ती मिळेल आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. परदेश प्रवास किंवा नवीन मालमत्ता खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी हे गोचर यशस्वी ठरेल.
कुंभ
कुंभ राशीसाठीही शनीचे हे नक्षत्र परिवर्तन सकारात्मक ऊर्जा घेऊन येईल. समाजात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कष्टाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि साठवलेल्या धनात वाढ होईल.
मीन
मीन राशीच्या लोकांसाठी शनीचे हे नक्षत्र गोचर सुख आणि शांती घेऊन आले आहे. तुमच्या आयुष्यात आनंदाचे दिवस येणार आहेत. तुम्हाला अपेक्षेप्रमाणे उत्तम परिणाम मिळतील. जर तुम्ही बाहेरगावी किंवा परदेशी जाण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. कार्यक्षेत्रात प्रगतीचे आणि उन्नतीचे योग दिसत आहेत.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
