Premium

शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ राशी होणार करोडपती? २०२३ संपण्याआधी तुम्हाला कसा होईल धनलाभ?

Shani Nakshtra Transit: न्याय देवता शनी व छाया ग्रह राहू यांचे नाते मित्रत्वाचे आहे. त्यामुळे शनिदेव राहूच्या नक्षत्रात असल्याचा प्रभाव हा शुभ असणार आहे. शनीचे शतभिषा नक्षत्रातील स्थान हे तीन राशींसाठी फायदेशीर आहे.

Shani Nakshatra Transit 2023 Rahu Graha Gives Major Life Changes With Extreme Money Blessing Success Precautions Astrology
शनी प्रभावित राशींना धन- संपत्तीत वाढ झाल्याने प्रचंड प्रगती होऊ शकते. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Shani Nakshatra Transit 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह जेव्हा राशी व नक्षत्र परिवर्तन करतात तेव्हा त्याचा शुभ- अशुभ प्रभाव सर्वच राशींवर होत असतो. साहजिकच त्या ग्रहाच्या तुमच्या कुंडलीतील स्थितीनुसार प्रभावाची तीव्रता कमी जास्त होऊ शकते. २०२३ हे शनीच्या मोठ्या हालचालींचे वर्ष ठरले होते. आणि वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात सुद्धा शनीचे नक्षत्र गोचर प्रभावी असणार आहे. शनीने काही दिवसांपूर्वीच शतभिषा नक्षत्रात प्रवेश घेतलं आहे. शतभिषा हे राहू च्या स्वामित्वाचे नक्षत्र आहे. न्याय देवता शनी व छाया ग्रह राहू यांचे नाते मित्रत्वाचे आहे. त्यामुळे शनिदेव राहूच्या नक्षत्रात असल्याचा प्रभाव हा शुभ असणार आहे. शनीचे शतभिषा नक्षत्रातील स्थान हे तीन राशींसाठी फायदेशीर आहे. या राशींना धन- संपत्तीत वाढ झाल्याने प्रचंड प्रगती होऊन अगदी लखपती- करोडपती होण्याची संधी मिळू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ राशी होणार करोडपती?

मेष रास (Aries Rashi Bhavishya)

मेष राशीला राहुचे भ्रमण बारावे येत आहे. राहू मीन राशीत म्हणजे मेष राशीच्या व्ययात आधीपासून असलेल्या नेपच्यूनच्या सानिध्यात येईल. मनाचा खंबीरपणा खूपसा मदतीचा ठरेल. या काळात झालेला आर्थिक लाभ उधळून टाकणे, अति दानधर्म करणे खूप त्रासदायक ठरू शकेल. मेष राशीतील शनीची परिक्रमा व्यवसायात तुम्हाला चांगले यश मिळून देऊ शकते. कारण व्यवसाय आणि नोकरीचे स्थान मानल्या जाणार्‍या दशम भावात शनिदेव प्रभावी असणार आहेत. त्यामुळे या काळात तुमची प्रतिष्ठा वाढू शकते. कोट्याधीश होण्याची संधी वाट्याला येईल पण त्यावेळी तुम्हाला संपूर्ण लक्ष व कष्ट एकवटून काम करणे आवश्यक ठरेल.

वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)

वृषभ ही शुक्राची राशी त्या राशीच्या लाभस्थानात राहूचे वास्तव्य व शनीचा प्रभाव खूपच शुभ व लाभदायक ठरेल. सामाजिक क्षेत्रात, राजकारणात हा राहू यशदायक ठरेल. तर नवीन परिचय, नवीन ओळखीतून उद्योगधंद्यात नोकरीत नव्या योजना आखल्या जातील. एकूण नातेवाईक मित्रमंडळींचा सहवास आनंदी उत्साही ठरेल. मात्र या काळात अति भावनिक, अति वेंधळेपणा टाळावा. कारण आपल्या उदार स्वभावाच फायदा कुणालाही घेऊ देऊ नका. लाभस्थानात राहू तर समोर पंचमस्थानात कन्या राशीतील केतू हा समाजकार्यात, राजकारणात खूप मदतीचा ठरतो. मात्र आर्थिक बाबतीत खूप हुशारीने वागावे. कुणावरही अतिविश्वास भरोसा करू नये. त्यातून नको तो मनस्ताप होऊ शकतो.

हे ही वाचा<< २०२४ मध्ये जगावर सात मोठी संकटं घोंगावतायत? बाबा वेंगा यांची येत्या वर्षाची भविष्यवाणी वाचून उडेल थरकाप 

मकर रास (Capricorn Rashi Bhavishya)

ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीसाठी शनी अकराव्या भावात प्रभावी आहे. ज्योतिषशास्त्रात हे उत्पन्न आणि लाभाचे स्थान मानले जाते. मकर राशीच्या व्यक्तींना या काळात उत्पन्नवाढ लाभू शकते. उत्पन्नाचे नवे स्रोतही निर्माण होतील. तसेच व्यवसायात नवे संपर्क तयार होऊ शकतात. मकर राशीच्या व्यक्तींना विवाहयोग आहे. नाती जुळण्यासाठी व त्यांना नव्याने चमक प्राप्त होण्यासाठी हा कालावधी शुभ असेल. संतती सुखाचे संकेत आहेत. तुम्हाला अपत्याकडून सुखद वार्ता मिळू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shani nakshatra transit 2023 rahu graha gives major life changes with extreme money blessing success precautions astrology svs

First published on: 29-11-2023 at 11:53 IST
Next Story
‘लक्ष्मी नारायण योग’ तयार झाल्याने ‘या’ राशी पुढील वर्षात होणार श्रीमंत? लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर मिळू शकतो प्रचंड पैसा