Kendra Tirkon Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांच्या हालचालीने अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होत असतात. हे योग जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत असतील तर त्या व्यक्तीला जीवनातील सर्व सुखं प्राप्त होतात, असं मानलं जातं. शनिदेव आपल्या स्वगृही कुंभ राशीत सध्या विराजमान आहेत. शनिदेवाने कुंभ राशीत ‘केंद्र त्रिकोण राजयोग’ निर्माण केला आहे. वैदिक ज्योतिष्य शास्त्रात कुंडलीमध्ये केंद्र त्रिकोण राजयोग तयार होणं अत्यंत शुभ मानला जातो. हा राजयोग या वर्षात काही राशीच्या लोकांसाठी खूप भाग्यशाली ठरु शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी हा राजयोग फायदेशीर ठरु शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘या’ राशींना मिळणार सुख?

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांसाठी केंद्र त्रिकोण राजयोग लाभदायक ठरू शकतो. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढल्याने पैशाची चिंता मिटू शकते. या काळात तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात. रखडलेली कामे मार्गी लागू शकतात. कामात मोठे यश मिळू शकते. वडिलोपार्जीत मालमत्तेतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणूकीतून फायदा होऊ शकतो. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. या काळात तुमचे आरोग्य चांगले राहण्याची शक्यता आहे.

(हे ही वाचा : Libra Yearly Horoscope 2024: तूळ राशीला लक्ष्मी कधी देणार प्रचंड धनलाभ? जाणून घ्या १२ महिन्यांचे राशीभविष्य )

मिथुन राशी

शनिदेवाने या राशीच्या नवव्या भावात हा शुभ योग घडवल्याने यावेळी नशीब मिथुन राशीच्या लोकांच्या बाजूने असण्याची शक्यता आहे. अचानक जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात. पैशाची आवक चांगली राहण्याची शक्यता आहे. या काळात व्यापाऱ्यांना दुप्पट नफा मिळू शकतो. उत्पनाचे नवे स्रोत मिळू शकतात. तुमचा सन्मान आणि संपत्ती वाढण्याची शक्यता आहे. सोने खरेदीचा योग जुळून येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी कौतुक होण्याची शक्यता आहे.

कुंभ राशी

कुंभ राशीच्या लोकांसाठी केंद्र त्रिकोण राजयोग फायदेशीर ठरु शकतो. कारण हा राजयोग या राशीच्या लग्नभावात निर्माण होत आहे. या राशीच्या लोकांच्या व्यावसायिक जीवनात अनेक बदल होण्याची शक्यता आहे. ज्या लोकांचा स्वतःचा व्यवसाय आहे, त्यांना भरपूर पैसा मिळू शकतो. या राशीतील लोकांच्या सुखसोयींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही नवीन मालमत्ता किंवा नवीन वाहन खरेदी करू शकता. या दरम्यान तुम्ही ज्या कामात हात घालाल त्यात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani planet made kendra tirkin rajyog these three zodiac signs more money pdb
First published on: 05-02-2024 at 19:21 IST